सोमवार, २७ जून, २०१६

खरच कुणाला जागरूक म्हणाव???

वारीच दर्शन घडला आज.
पाहिला... प्रत्येकाच्या चेहऱ्याला निरखून
प्रत्येक जण जात धर्म विसरून
त्या पांडुरंगाच मुखदर्शन
घ्यायला निघाला होता 
तो दिसेल अथवा दिसणार देखील नाही 
पण तरी 
डोळ्यात भाव होता माझा विठ्ठल सगळ सावरेल 
कुठे ही अडाणी भोळे भाबडी लोक
त्या प्रत्यक्षात न दिसणार्याला
कर्ता करवीता मानतात
फक्त स्वतःसाठी नाही तर्
अवघ्या जगासाठी मागण मागतात
"अगदी जात धर्म विसरून"
साऱ्याना सुखात ठेव
सगळ्यानच रक्षण कर म्हणतात
आणी
एकीकडे सुशिक्षित लोक
विधेयक घेऊन आरक्षण मागतात
खरच कुणाला जागरूक म्हणाव???
"स्वमतीवर अविश्वास असणाऱ्याना
आरक्षणाच्या कुबड्या लागतात "
झोम्बनार‬ आहे पण सत्य आहे