मंगळवार, १९ जुलै, २०१६

लाज वाटतेय..

लाज वाटतेय..
कोपर्डी बलत्कराबद्द्ल वाचून
पण त्याहून जास्त लाज वाटतेय
पेपर मधील बातम्या पाहून की
"आज ह्या पक्षाच्या ह्या ह्या कार्यकर्त्यानी सत्ताधारी पक्षाच्या ह्या नेत्यांची भेट घेऊन किंवा अमुक जिल्हा अधिकार्यांची किंवा पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन कोपर्डी बलात्कार प्रकरणात त्या मुलीला आणी तिच्या घरच्यांना न्याय मिळावा आणी गुन्हेगाराना कडक शिक्षा व्हावी ह्यासाठी निवेदन दिले"
किती ती धडपड पेपर मध्ये नाव येण्यासाठी आणी आम्ही किती सामाजीक दृष्ट्या जागरूक आहोत दाखवण्याची"माणसाच्या शरीराची झालेली विटम्बना पण राजकारणाचा किंवा चर्चेत येण्याचा विषय आहे का मग त्याला जमल तर जातीय रंग द्यायलाही मागे पुढे पहायला नको" 
कुणीतरी आपली मुलगी गमावलीय कुणीतरी बहीण गमावलीय कुणीतरी मैत्रीण देखील गमावली असेल,
पण नाही ह्याशी आमच देणघेण नाही आम्ही आंदोलन करणार. 
करा ना आंदोलन करा राग व्यक्त करा
पण त्यासाठी कुठला पक्ष किंवा पेपर मध्ये आंदोलनात हे उपस्थित होते हे छापून यायलाच हव का
माझ्या लक्षात आलं नाही. 
समाजासाठी काही करायचय ना तर नावाचा बोभाटा न करता करा
कुठल्या पक्षाच नाव न घेता करा.
कमीत कमी झालेल्या गोष्टीची तीव्रता लक्षात घेऊन आणी नेतेपणा बाजूला ठेवुन

"माणूस नावाचा पण एक पक्ष असतो त्यात सामील व्हा"

गुरुवार, १४ जुलै, २०१६

"मला उमजलेला विठ्ठल"

"प्रपंचात सुखी रहा पण पांडुरंगाला विसरू नका"

असं नेहमी म्हणते आई

तिनेही ऐकलेलंच होतं कुठेतरी

पण तरी तिच्या बोलण्यातला विश्वास काही अंशी का होईना

"कुठेतरी कुणीतरी आपल्याला वरतून पाहतंय" असा आभास निर्माण करत होता

मी बघितलं नाहीए आणखीन त्याला

पण फक्त एक काळ्या रंगाची मूर्ती माहितेय मला

ज्याला सगळे "विठ्ठल" म्हणतात

१४ विद्या ४ वेद ४ उपवेद ६ वेदांग हे २८ योग घेऊन तो युगानयुगे विटेवर अचल उभा आहे

आपलं मागणं आपली गाऱ्हाणी घेऊन लोक त्याच्या उंबरठ्यावर जातात

तो बिचारा आधीच विटेवर उभा आहे आणी त्यात ही असली

अपेक्षा घेऊन येणारी लाखों लोक

पण तरी तो अगदी निश्चिंत असतो

ना आश्वासन देतो ना अपेक्षा भंग करतो

पण जे देतो ते असतं आंतरिक सुख

एक निरागस हसुउमटतं लहान बाळापासून ते कणा मोडलेल्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरसुध्दा

"विठ्ठल विठ्ठल" म्हंटल की

कधी प्राक्तनांचे पुरावे नाहीतआणि कधी भविष्याचे देखावे नाहीत

अगदी सारं काही विसरून उभा "माणूसरूपी" धर्म "वारकरी"

नावाच्या छाटीखाली जमतो "आषाढी एकादशीला" आणी त्या चंद्रभागेत स्नान करून पुण्य मिळालं म्हणत निघतो परतीच्या वाटेने.

आता खरंच पुण्य मिळतं का तेही त्यालाच ठाऊक

विठ्ठलावर लिहीताना मी आस्तिक आहे की नास्तिक हा प्रश्न मला आजतागायत पडला नाही

कारण अध्यात्माचा पलीकडे जाऊन जाती धर्म झुगारुन

वर्ण वंश पैसा ह्या सगळ्याना तिलांजलि देऊन "एक माणूस रूपी अभंग रचलाय" त्या पांडुरंगाने ज्याला आपण "वारकरी" म्हणतो

"आश्चर्य फक्त इतकंच की काळा असूनही इतका तेजोमय की त्याच्या रूपात तल्लीन होऊन जावं तो फक्त पांडुरंग आहे"

एक वेगळीच अनुभूती आहे हा "काळा विठ्ठल"

कुणाचा सखा

कुणाचा वाली

तर उभ्या जगाची माऊली

ह्या एकादशीला पुन्हा त्या खऱ्या धर्माला

त्या प्रत्येक वारकऱ्याला

ज्याचं "तीर्थ विठ्ठल आहे


आणी क्षेत्र देखील विठ्ठल आहे"

एकादशीच्या शुभेच्छा...

अव्यक्त...व्यक्त करताना

१४ जुलै २०१६