काल कानात हेडफोनस घालून नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला निघालो साधारण 10 वाजत आले असावेत आणी समोरच्या बाजूला असलेल्या सरकारी शाळेसमोरच्या बसस्टॉप जवळ जाऊन उभा राहिलो , शाळा सुरु होण्यासाठी थोडासाच वेळ असावा कदाचित म्हणून तिथे लहान मुलांची आणी त्यांना सोडवायला येणाऱ्या पालकांची वर्दळ दिसत होती, फेरीवाले आणी कामावर जाणारी लोक,ऑटो ह्यामुळे परिसर अगदी गजबजलेला होता.
बस यायला वेळ असल्याने साहजिकच रस्त्यांवरची गडबड पाहत वेळ काढत होतो आणी तितक्यात नजर एका महीलेवर गेली साधारण 20 22 वर्षांची असावी,कडेवर बाळ घेऊन दुसऱ्या खांद्यावर शाळेची बॅग अडकवलेली ती आपल्या लहान मुलीला शाळेत सोडवायला आलेली होती, साधारण 5 वर्षांची ती मुलगी आपल्या आईच हाताच बोट पकडून शाळा सुरु होण्याची वाट पाहत उभी होती.
विश्वास ठेवावा की नाही अस दृश्य होता ते
ज्या महिलेचा उल्लेख मी करत होतो ती दिसायला अगदीच भीक मागणार्या लोकांसारखी दिसत होती, अनवाणी पायानेच ती आपल्या मुलीला शाळेत सोडवायला आली होती केस विस्कटलेले आणी मळलेले कपड़े, कडेवर असलेल्या बाळाचे कपड़ेही मातीने माखलेले दिसत होते आणी शाळेत जाणाऱ्या मुलीने शाळेचा गणवेष घातलेला होता पण बूट मात्र तिच्या पायात नव्हते. फार हालाखीच्या परीस्तीथीत दिवस काढत असावे असा एकंदरीत अंदाज एव्हाना मला आला होता.
फार वाईट वाटणार किंवा किव यावी अस दृश्य होता म्हणता येईल पण अचानक आठवला की मी काहीतरी पहायला विसरलो होतो???
हो...त्या चेहऱ्यावरच हासु
त्या आईच्या त्या बाळाच्या आणी त्या शाळेत जाणाऱ्या मुलीच्या, ते हासु ज्यामुळे ते बाकी लोकांपेक्षा जास्त सुंदर दिसत होते.
आणी हो मला वाटत मी पाहिलेला तो अत्यंत सुंदर क्षण होता, ज्यात त्या आईने प्राप्त परिस्थिती मध्ये आपल्या लेकरांना हसायला शिकवलं होता, ती मुलगी आनंदाने उड्या मारत चालत होती आणी शाळेला जाण्यासाठी तिच्या आईच हातचं बोट ओढत होती, मग हळुच आईने बोट सोडत तिच्या हातात काहीतरी दिला कदाचित खाऊसाठी पैसे दिले असावे आणी मुलीचा पापा घेत ती पुन्हा निघाली.
न राहून मी सामोरा होत तिला विचारला
"तुम्ही त्या डेपोपसल्या झोपड़पट्टीत राहतात का"
आणि तीने गर्वाने उत्तर दिला "हो"
(कुणीतरी कनाखाली जाळ काढावा अस झाला क्षणभर)
"आणी ह्या माझ्या पोरी हायेत, एक शाळत जाते, म्या सकाळच्याला सोडायला येते आणी साँच्याला घ्यायला बी येते"
पुढला प्रश्न विचार्ण्यापूर्वी ती दीसेनासी झाली होती
आणी मी मलाच दिसेनासा झालो होतो.
बरेच प्रश्न अनुत्तरित होते..आणी कदाचित राहतील ही
जसे
"जगण्याची इतकी जिद्द तिला कुठुन येते??"
"उन्हात पाय भाजत असताना तिला कुठली इच्छाशक्ति इतकी दूर अनवाणी चालत आणते???"
"असा आनंदाच कुठला औषध तिला गवसला आहे??"
मग वाटलं आपण किती क्षुल्लक आहोत
तिच्यापेक्षा तर् जास्तच सुखसुविधा आपल्याकडे होत्या आणी आपण मात्र कीत्थे गीरवन्यात वेळ घालवतो की
"जीवन आपल्याशी किती अयोग्य वागतय"
आणी मग त्या वेळेला सन्धीत बदलायच राहून जाता,
सार् अगदी धूसर झाला होता काही वेळासाठी आणी
मी....
मी सुद्धा अगदी धूसर
#कुछपढ़ीसीबाते
#कुछलिखीसीबाते
-अव्यक्त....व्यक्त करताना