एक कौलारू घर लागला
त्यादिवशी प्रवासात,
आधी कुठे तरी पाहिलंय
सारख भासत होतां
पण मग आठवला
शाळेत मराठीच्या पुस्तकात
बऱ्याचदा दिसायच,😇😇
न बघता पण मी त्याला
आरामात रंगवायचो त्यावेळी
माझ्या विचारांच्या कॅन्वासवर् 🙂🙂
पण आज अगदी क्षणात
समोरून निघून गेला ते,
बालपण निघून गेला ना अगदी तसंच 😅
कारण इतका पसारा नसायचा
विचारांचा त्यावेळी,
लहान लहान बोटांनी
मातीत खोपा बांधायचो,
मोडला तरी
पुन्हा नव्याने रचायचो, 🙂🙂
कारण इतक्या अपेक्षा
नसायच्या त्यावेळी,
आज हातात चहाचा cup घेत 😃
आठवणींचा कॅनव्हास वर् ते
चित्र बघू शकत होतो
पण पुन्हा रंगवू शकत नव्हतो, 😐
फार लवकर सुकला ते चित्र
अगदी बालपणासारख 🤗🤗
"अव्यक्त..व्यक्त करताना"