रविवार, २३ एप्रिल, २०१७

जागतिक पुस्तक दिवस

हल्ली शांत शांत असतात ती फार..
लोकांशी संवाद पण त्यांचा कमीच झालाय अशात,

सांगायला नेहमीच काहीनकाही असतंच त्यांच्याकडे
मग एखादी गोष्ट, कविता किंवा एखादी चारोळी ही सही,

सतत डोकावत असतात माणसाच्या मनात 
आणि सहज व्यक्त होतात प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी,

कधीतरी आपल्याच भावनांच
प्रतिबिंब होऊन येतात,

तर कधीतरी आठवणींचा झरोका,
फार प्रामाणिक असतात माणसांशी

म्हणजे बघा...

एखादा उमटलेला शब्द
मिटोस्तोवर बदलत नाही.

पण आजकाल अडगळीत भेट होते बऱ्याचदा,

खरच मोबाइल आल्यापासून
छातीवर पुस्तक ठेवून झोपलोच नाहीये.

#जागतिकपुस्तकदिवस 🙌
#अव्यक्तव्यक्तकरताना