अव्यक्त....व्यक्त करताना.

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

तीच्यापासुन दुरावा कधी अनुभवला नव्हता पण जेव्हा अनुभवला ना तेंव्हा हे जाणवलं-

ती म्हणायची तु आलास की घरात चैतन्य येत 
मी मात्र कळत नसल्याचा आव आणत
तीचा शब्द न शब्द कानात साठवायचो
अगदी माझ्या येण्याने तीच्या चेहऱ्यावरील बदलणार्या छटान् सवे
मला कळत नव्हता अस नव्हतग
पण माझ मनच माझ्या हातात होत
ज्याला मी तुला "निघतो" म्हणताना समजवायचो
ती आता रडणार आता मागे वळू नकोस
तु आज मनाचा नाही तर वेळेचा गुलाम आहेस
तिच्यासाठीच जातो आहेस ना
मग डोळ्यातुन टिपुसही काढण्याचा
आज तुला अधिकार नाहीए
ती रडणारच् आणी का रडु नये तीने
आखेर आभाळा इतकी माया
आणी सागरा इतक प्रेम
जे तीने केल होत माझ्यावर
पण तरी मी मागे वळु शकत नव्हतो
कदाचीत तीचे डबडबलेले डोळे पाहणं
मला झेपल नसतं
किंवा तीला पाहुन माझाही बाँध फुटला असता
तीला ऐक घट्ट मिठी मारून क्षणभर सगळं काही वीसराव
असं माझ्याही मनात यायचं
पण वेळ हळुच म्हणायची
"मला उशीर होतोय"
आवर तुझ्या मनाला सावर ह्या क्षणाला
तुझ्या पडणाऱ्या प्रत्येक पावलातं
आज पर्यंत सोबत होती ती
पण आज तुला चार पावलं पुढे जायचय
तीच्या पुढे जाण्यासाठी नव्हे
तर तु जेव्हा यशाचा जीना चढत असशील ना
तेव्हा ते डबडबलेले डोळे पुन्हा पाहण्यासाठी
त्यावेळीही पाणी असेलच तीच्या डोळ्यात
पण ते विरहाच नाही तर् गर्वाच असेल
त्यावेळी ऐक उत्कट उर्मी असेल तीच्या मनात
आणी का असु नये
तीलाच असणार् तो गर्व
आणी का असु  नये
तीच्याच डोळ्यांत असणार् ते पाणी
आणी का नसु नये
आई आहेत ना ती माझी
Click here to Reply or Forward
0.6 GB (4%) of 15 GB used
Manage
Terms - Privacy
Last account activity: 0 minutes ago
Details
द्वारा पोस्ट केलेले Pushkar Deshmukh येथे ९:५९ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पण्या (Atom)

माझ्याबद्दल

Pushkar Deshmukh
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

ब्लॉग संग्रहण

  • ►  2018 (4)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (2)
  • ►  2017 (3)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  जानेवारी (1)
  • ►  2016 (12)
    • ►  ऑक्टोबर (4)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  जुलै (2)
    • ►  जून (1)
    • ►  मार्च (1)
    • ►  फेब्रुवारी (1)
    • ►  जानेवारी (1)
  • ▼  2015 (2)
    • ▼  ऑक्टोबर (1)
    • ►  जून (1)
ऑसम इंक. थीम. fpm द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.