तीच्यापासुन दुरावा कधी अनुभवला नव्हता पण जेव्हा अनुभवला ना तेंव्हा हे जाणवलं-
ती म्हणायची तु आलास की घरात चैतन्य येत मी मात्र कळत नसल्याचा आव आणत तीचा शब्द न शब्द कानात साठवायचो अगदी माझ्या येण्याने तीच्या चेहऱ्यावरील बदलणार्या छटान् सवे मला कळत नव्हता अस नव्हतग पण माझ मनच माझ्या हातात होत ज्याला मी तुला "निघतो" म्हणताना समजवायचो ती आता रडणार आता मागे वळू नकोस तु आज मनाचा नाही तर वेळेचा गुलाम आहेस तिच्यासाठीच जातो आहेस ना मग डोळ्यातुन टिपुसही काढण्याचा आज तुला अधिकार नाहीए ती रडणारच् आणी का रडु नये तीने आखेर आभाळा इतकी माया आणी सागरा इतक प्रेम जे तीने केल होत माझ्यावर पण तरी मी मागे वळु शकत नव्हतो कदाचीत तीचे डबडबलेले डोळे पाहणं मला झेपल नसतं किंवा तीला पाहुन माझाही बाँध फुटला असता तीला ऐक घट्ट मिठी मारून क्षणभर सगळं काही वीसराव असं माझ्याही मनात यायचं पण वेळ हळुच म्हणायची "मला उशीर होतोय" आवर तुझ्या मनाला सावर ह्या क्षणाला तुझ्या पडणाऱ्या प्रत्येक पावलातं आज पर्यंत सोबत होती ती पण आज तुला चार पावलं पुढे जायचय तीच्या पुढे जाण्यासाठी नव्हे तर तु जेव्हा यशाचा जीना चढत असशील ना तेव्हा ते डबडबलेले डोळे पुन्हा पाहण्यासाठी त्यावेळीही पाणी असेलच तीच्या डोळ्यात पण ते विरहाच नाही तर् गर्वाच असेल त्यावेळी ऐक उत्कट उर्मी असेल तीच्या मनात आणी का असु नये तीलाच असणार् तो गर्व आणी का असु नये तीच्याच डोळ्यांत असणार् ते पाणी आणी का नसु नये आई आहेत ना ती माझी
|
|
|
सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा