२१ वर्ष ८ महिने आणी २५ दिवस होत आहेत
तुझी ओळख होऊन...
पण तरी देखील आजही तु तशीच आहे जशी मला पहिल्यांदा पाहून आनंदी होतीस..
कदाचित तु पहिलीच व्यक्ती असशील जीने मला पाहताच प्रेम केला ना की मला पारखुन
बऱ्याच दिवसाच लिहायचं होता हे..पण हिम्मतच नव्हती होत..आणी मग आज धाडस केला...
एका अशा व्यक्तीबद्द्ल लिहायचं जीने व्यक्ती एकच पण भुमिका अनेक निभावल्या..माझा हातात असता तर आयुष्याच्या रंगभूमीवरचा उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मी तुलाच दिला असता.. कारण याहून सरस भुमिका मला पाहायचीही नाहीए..
वाटेल तेव्हा जिच्यावर चिड्ता याव
गरज पडले की तिच्याजवळ रडता याव
हसून सार काही उलघडता यावं..
इतक सुंदर नातं जेव्हा मिळत ना..मग थोडसं पटत..
नसीब नाम की चिड़िया
जरूर कही तो उड़ती है..
घराबाहेर टाकलेल्या त्या पहिल्या पावलाने त्या दिवशी मान वळवायला नकार दिला होता...कारण तुझ्या भोवती घोंगावनरा हा भ्रमर कदाचित तुझ वलय भेदुच शकला नसता..आणी पुन्हा तीच मिठी तीच ओढ तीच साखरझोप आणी तुझ्या हातच ते जेवण गोड...
खुप धाडस करून लिहिलय बराच वेळ ही लागला हे लिहायला...आणी तुलाही 44 वर्ष लागलीत अस काहीतरी वाचनात यायला..
तुला काही द्यावं इतकी कुवत देवाने दिली नाही..
पण जीने "अस्तित्व" या शब्दाची जाणीव दिली अशा व्यक्तीला माझा शब्दांची ही वाढदिवसाची तुटपुंजी भेट
Yes...
she is my friend..
she is my sister..
She is my girlfriend..
and yes she is my mother
Happy birthday आई....
- अव्यक्त..व्यक्त करताना
पुष्कर, नाही लिहु शकत काहीच.
उत्तर द्याहटवा"काळजी घे " अस म्हणत फिरणारे खुप भेटलेत.. सोबत न राहता काळजी करणारी माय,आई,माता!!
धन्यवाद.!! वाचण्याची संधी दिल्या बद्दल.
एक असा विषय की ज्याच्याबद्दल लिहायला खुप काही आहे पण तरीही तो संपूर्ण कधीच व्यक्त नाही होणार. आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरीही ह्या दोन अक्षरी शब्दाबद्दल लिहावे ते कमीच; 'आई'.
उत्तर द्याहटवालिहिणाऱ्याने लिहित जावे अन् वाचनाऱ्याने वाचत जावे असाच हा विषय.
सगळ्याच मर्यादा जिथे संपतात, कधीही न उलगड़नार कोड- 'आई'.
पुष्कर, नाही लिहु शकत काहीच.
उत्तर द्याहटवा"काळजी घे " अस म्हणत फिरणारे खुप भेटलेत.. सोबत न राहता काळजी करणारी माय,आई,माता!!
धन्यवाद.!! वाचण्याची संधी दिल्या बद्दल.
Thank you yogesh...
हटवा:) Birthday wishes:)
उत्तर द्याहटवाThank you
हटवा:) Birthday wishes:)
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाआई .....तिच्यापासून सुरु होऊन तिच्यापाशीच संपणारं अस्तित्व आपलं.... तेही तिनंच दिलेलं....अगदी निरपेक्षपणे.... आयुष्याचं सार आहे आई म्हणजे....तरीही न उलगडणारं कोडं....
उत्तर द्याहटवावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you rutuja
हटवाApratim Pushkar! Speechless!
उत्तर द्याहटवाVasu... Thank you and all the best mitra tula
हटवा