रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

"और राही फिरसे मील गया"

"मी तुमच्या सोबत dance करू शकतो का??"

अगदी सद्गृहस्था सारख चेहऱ्यावर मंदस्मित ठेवत अगदी विश्वासाने हात पुढे करत दिगंतने राहीला विचारला.

"Sure" अस म्हणत हसत हसत तीनेही हात पुढे केला.

आणी तिचा हात अलगद हातात घेत दिगंत तिला नृत्यमंचावर घेऊन गेला.

आणि मग तितक्यात एका सुंदर गाण्यावर दोघं dance करू लागले.

"तुम्ही फार छान व्यक्ति आहात"अशी प्रतिक्रिया तितक्यात तीने दिली 

"अच्छा, म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीला नृत्याकरिता विचारलं त्याबदल्यात मला ही प्रतिक्रिया मिळालेली दिसतेय" असं म्हणत तोही हसला 

"तुमचं बोलणं तुमच्या वागण्याइतकंच प्रभावी आहे" असं म्हणत ती पुन्हा हसू लागली 

"पण तुमच्या नवऱ्याला कदाचित तसं वाटलेला दिसत नाही"

अस म्हणत तो तिच्या जवळ आला आणी म्हणाला "मघाशी मी तुम्हाला नृत्यासाठी विचारलं तेंव्हापासून त्यांची नजर माझावरच घोटाळतेय"

"त्याची काळजी करू नका थोडासा राग आला असेल"अस हसत हसत राही म्हणाली

"हो साहजिक आहे, आणी शिवाय तुम्ही माझापेक्षा जास्त त्यांना ओळखतात" दिगंत हसून म्हणाला 

"त्याकडे फारसा लक्ष देऊ नका" अस म्हणत राही म्हणाली "आता ह्याक्षणी तो हातातल्या काट्या चमचाने उगाच table कडे पाहत दातओठ खात असेल आणी आपल्याकडे अशा चोरट्या नजरेने पाहत असेल जणु काही तो आपल्याला पाहतच नाहीए आणी त्याला काही फरक पडला नाहीए"

राहीच म्हणणं तपासन्याकरीता दिगंतने मान वळवली आणी तो आश्चर्याने थक्क झाला.

कारण राही अगदी बरोबर म्हणाली होती.

आणी तितक्यात गाणं सम्पला आणी दिगंतने राहीला तिच्या table पर्यंत नेऊन सोडला आणी नृत्याबद्द्ल thank you म्हणत तिच्या हाताच चुम्बन घेत तो निघाला 

पुढे होत दिगंत राहीच्या नवऱ्याला म्हणाला "तुम्ही फार नशीबवान आहात तुम्हाला इतकी सुंदर बायको मिळाली"

"Mr.??? तुमचं नाव ठाऊक नाहीए मला "

"अन्वय. Mr. अन्वय " 

"तुम्हाला भेटून छान वाटलं" अस म्हणत दिगंतने त्यांचा निरोप घेतला.

"किती गोड मुलगा आहे" राही म्हणाली 

"गोड"?? त्याचा चेहरा पाहीलास, अस वाटत होत की कित्येक मुलींना तो फसवत असेल, आणी तसंही तुझ्यासाठी मी सोडून सगळेच गोड असतात हो ना?? अन्वय म्हणाला 

"मुलींना फसवत असेल???" अन्वय अरे मी ७० वर्षान्ची झालीय आता, कुठला तरुण मुलगा माझी का फसवणूक करेल आणी शिवाय त्याने माझ्या सौंदर्याची तारीफ केलीय त्यामुळे मला आज एकदम तरुण झाल्यासारख वाटतय आणी आपल्या लग्नाला ४५ वर्ष होत आहेत् त्यामुळे इतक जळण्याची गरज नाहीए" अस राही हसत हसत म्हणाली.

"तरुण???सुंदर?कालपर्यंत कुणीतरी आपल्या थकलेल्या शरीराबाबत आणी अंगावरल्या सूर्कूत्या बद्दल तक्रार करत होता आणी आज अचानक सुंदर वाटू लागलय" अन्वय म्हणाला 

"हो पण ते काल वाटत होता आज नाही आणी राजा  आपण इथे जेवायला आलोय तर् खायला काही मागवूयात का??मला फार भूक लागलीय please??" राही म्हणाली 

"हो पण एका अटीवर की तु मला promise कर् की यानंतर तु माझ्याशिवाय  दुसऱ्या कुणासोबत dance करणार नाहीस??"अन्वय म्हणाला 

"हो बाबा हो" राही हसत हसत म्हणाली आणी हळुच अन्वय जवळ जात म्हणाली "मला फार छान वाटला की कुणी दुसऱ्याने माझा हात हातात घेतल्यावर तू असुरक्षित झाला हे  पाहून" आणी राही एकदम खळखळून हसली.

"असुरक्षित??आणी मी??काहीही ते उगा आपला असचं. जाऊदे सोड जेवण मागवुयात" अन्वय म्हणाला

आणी त्यानंतर दोघांनी एकदम आनंदात candlelight dinner केला.

त्यनंतर रात्री दिगंतच्या मोबाइल वर एक मेसेज आला 

"Thanks दिगंत, राही आज एकदम खुष झाली आणी शिवाय पुन्हा माझ्या जुन्या राहीचा विश्वास आज पुन्हा आला, तु केलसं त्याबद्दल खरच खुप आभार"

"काका तुम्ही सांगितला तसंच मी केला, बाकी आपका राही आपको राही फिरसे मिल गया"😃😃

#कुछपढ़ीसीबाते

#कुछलिखीसीबाते

#अनुवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा