गोष्ट इराक मधे घडली होती,
त्या दोघी बहिणी इराक मधे ५ दिवसांसाठी कसल्या तरी कामानिमित्त गेल्या होत्या, एका धार्मिक ठिकाणी त्यांना भेट द्यायची होती, पण तिथली सकाळची एकंदरीत गर्दी पाहता त्यांनी दुपारी जाण्याचं
ठरवला, हॉटेल मधली सगळी आवाराआवर करून त्या दोघी त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्या, त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता हा भर बाजारातून जात असे, पुढे जात असताना त्यांना एक १२ वर्षाचा मुलगा T shirts विकताना दिसला, त्याचा चेहरा अगदी धूळीने माखलेला आणि कपड़े अगदी मळलेले होते, तो अरबी भाषेत ओरडत होता " T shirt लेलो २००० इराकी में ५ T shirts लेलो" त्यातल्या एका बहिणीला अरबी भाषा कळत होती, त्या दोघीनी आपसात चर्चा केली की जाऊन तर पाहूयात कसे आहेत कपड़े आणि मग त्या पाहू लागल्या, किम्मती ची विचारपूस करत असताना एक बहीण म्हणाली, चल आपल्याला उशीर होतोय आणि त्या पुढे जाऊ लागल्या तर तो मुलगा पळत मागे येत म्हणाला " क्या हुआ, कितने पैसे दे सकते हो आप" त्या दोघी आपसात ठरवून हजार इराकी असा म्हंटल्या, त्यावर तो उत्तरला की हजार मधे माझी मूद्दल देखील निघणार नाही जास्तीत जास्त मी १७०० इराकी करु शकेल, त्यांनी चर्चा केली आणि त्यांना वाटलं कपड़ा तसा छान आहे घ्यायला हरकत नाही म्हणून त्यांनी ते T shirts घेतले आणि त्याला पैसे देऊ केले त्यानंतर त्याला कमालीचा आनंद झाला होता, त्याच्या चेह्र्यावरची धूळ वगेरे क्षणभर अगदी गायब झाली होती, त्याचा आनंद त्याच्या डोळ्यात साफ दिसत होता त्यावर एका बहिणीने विचारलं "लागता है दिन की बिसमिल्ला अभी हुई है तुम्हारी" त्या दोघी एका व्यापारी घरातून होत्या त्यामुळे त्यांना रोजच्या व्यवसायाचं काय असता हे ठाऊक होता कधी कधी एक दिवस तर कधी कधी आठवडाभर सुद्धा पैसे मिळत नसे, मग तो मुलगा म्हणाला " नही mam दिन की नही हफ्ते की हुई है" क्षण भर दोघीही सुन्न झाल्या होत्या, मग त्यातल्या एकीने त्याला विचारला तुझ्या घरी घरी कोण कोण असता त्यावर तो म्हणाला, "मै,मेरी एक छोटी बहन और अम्मी, मै पैसे कमाकर मेरी बहन कॊ school भेजता हूँ" न् राहून एका बहिणीने पुन्हा प्रश्न विचारला "तुम्हारे अब्बा, तुम्हारे वालीद साहब नही है" त्यावर तो म्हणाला की "कुछ दिन पहेले दूर मेरे गाँव में कुछ लोग आये थे बड़े सें काले कपड़े पहेने थे उन्होने मेरे अब्बा में माथे पे गोली मार दी" हे ऐकताच दोघी बहिणीना गहिवरुण आला आणि एक बहीण त्याला थाम्ब म्हणत पळत हॉटेल मधून काही खायच्या गोष्टी घेऊन आली आणि त्याला देऊ केल्या त्यावर तो म्हणाला "आज अम्मी बहोत खुश होगी ये मेरे हफ्तेभर का खाना हो गया" त्यांना ते ऐकून खूप आनंद झाला कारण ते म्हणतात ना "कुणा भुकेल्या व्यक्तीच पोट भरला की तो मनातून आशीर्वाद देतो", तो जाता जाता त्यांना म्हणाला की " मै दुआ करूँगा उस मौला अली सें जिसके दर पर तुम आये हो की वो तुम्हारी सारी दुआए जल्दी मंजूर करदे" ते ऐकून त्या आनंदाने पुढे गेल्या आणि म्हणाल्या की "आज अपने वतन सें दूर आये है तो अपनी हिंदुस्तान की हजमत पता चली" खरचं ह्यात काहीही दुमत नाहीए की " जर आपणच आपल्या देशाचं सौंदर्य पाहू शकत नसू तर इतर लोक कसे पहतील"😅🙌🏻
#LexHindustan
#अनुवाद
#अव्यक्तव्यक्तकरताना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा