अवघा ५० वर्षे आयुष्य लाभला त्यांना
पुष्कर देशमुख
पण काम इतिहासाला लाजवेल आणि भविष्यातही भारताच नाव गाजवेल इतका मोठा...!पण त्यांना अभिप्रेत असलेला खरच आजचा भारत आहे का?की महाराज फक्त शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात, निवडणुकीच्या प्रचारात आणि जागोजागी उभारलेल्या रेखीव मुर्त्यानमधेच
उरलेत.
पराक्रमाची साक्ष देणारा केसरी ध्वज आम्ही किती पटकन हिंदू धर्मीय केला आणि "हिंदवी" स्वराज्याचा संस्थापक
जो फक्त एका धर्माचा नाही तर रयतेचा राजा आहे त्याला आपोआप हिंदू राष्ट्राच्या चौकटीत बांधून आम्ही मोकळे झालो,
ह्यावेळी ही चूक आपण वेळेवर ढकलू नाही शकत कारण हा वृत्ती चा दोष आहे ना की वेळेचा.४०० वर्षे होत आली तरी महाराज जयंती सोडल्यास बाक़ी वेळ राजकीय मुद्दा म्हणून जास्त चर्चिले जावे
ह्यहून मोठा दुःख भारतीय समाजाच काय असावा. अखंड स्वराज्यासाठी ज्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला शाहिस्तेखानाची चार बोट छाटली त्या महाराजानच्या भारताने नंतर अहिंसेच बिरूद मिरवण्यात धन्यता मानली.
(स्वातंत्र्या नंतर हे गाँधीजी ना ही अपेक्षित नव्हता आपल्या देशाच रक्षण हे आपण कराव ते ही ह्याच मताचे होते)
आज गमावलेला तिबेट, ६२ साली चीनी लोकांनी आपल्या घरात घुसून आपल्या थोबाडित मारून जाण (अहिंसेच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांच्यात स्वरक्षणाची धमक असते) आणि पाकिस्तान सारख्यानी आपल्याला दररोज़ हल्ल्याची धमकी देणा
ह्यहून हास्यास्पद काय आहे.
अपमानासाठी रडत बसणे ह्याला पुरुषार्थ नसतात म्हणत तर कर्तृत्व सिद्ध करत अपमानाचा बदला घेतला जात असतो. औरंगजेबाच्या दरबारात अपमान झाल्यावर महाराजांनी किल्ल्याची कमान तोडून स्वराज्याच पुढचा पाऊल टाकला होता आणि बादशहा दरबारातल्या कुठल्याही मर्दाला असली हिम्मत दाखवता आली नव्हती आणि महाराजांनी अपमानाचा कसलाही गवगवा न करता आपला पराक्रम सिद्ध केला होता, सन्मान ही पराक्रमाला मनातून मिळालेली पावती असते ती मागून मिळणारी गोष्ट नाहीए, बाक़ी स्वातंत्र्यानंतर काळजात रुतलेला अपमानाचा खंजीर आपण कधीतरी काढून फेकूच पण त्याने जिव्हारी लागलेली जखम मिटनार नाही हे ही तितकच खरा.
असो... इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे भावनेचा किंवा श्रद्धेचा नाही.
महाराज समजावे उमजावे आणि अमलात यावे हा हेतु आहे बाक़ी तथास्तू..
पुष्कर देशमुख

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा