सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

तेजस्वि नावधीतमस्तु..!

त्यावेळी त्यांच वय होता अवघा ३० वर्षे आणी ब्रिटिश सरकारने त्यांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली वर्ष १९११ पासून ते १९६० पर्यंत.
तसा पाहता कुठलीही सामान्य व्यक्ति हे ऐकताच कोलमडून पडली असती पण हा मनुष्य भर कोर्टात म्हणतो Are you sure British will rule India upto 1960?
इतका धाडस की ज्यांनी आपल्या नाकावर टिच्चुन १५० वर्ष राज्य केला त्यांच्या साम्राज्याच्या अस्तित्वावर हा माणूस थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणी १९४७ ला भारत स्वातंत्र्य होतो तसा पाहता हा माणूस जिंकला म्हणायला हरकत नाही पण स्वातंत्र्य भारतच दुर्दैव की आम्हा भारतीयांना हा स्वातंत्र्यवीर कधी समजून घ्यावाच वाटलाच नाही, आधी एका धर्माचा शिलेदार म्हणून आमच्या इतिहासाने त्याला हिणवला आणी त्यात भर म्हणजे स्वांतंत्र्य मिळाल्यावर ही त्यांच्या घरच्यांना त्यांच्या सम्पत्तिची मालकी मिळवून देण्यात पण आमच सरकार अपयशी ठरला सगळंच दुर्दैव तसा पाहता.
पण...हा माणूस हरला नाही ते म्हणतात ना सूर्याला कधी ग्रहण लागत नसता तर तो पाहणाऱ्या च्या नजरेचा दोष असतो काहीसं तसच ह्या माणसाबाबत म्हणावं लागेल.
अंदमानातल्या त्या खोलीत शिक्षा सहन करत असताना ही ह्या माणसाच् देशप्रेम तिळमात्र कमी झाला नाही आणी तिथे सुद्धा ह्या माणसाने कितीतरी अजरामर काव्य लिहिली.
"ने मजसी ने परत मातृभुमिला सागरा प्राण तळमळला" ह्या कवितेतून पहिल्यांदा सावरकर शाळेत ओळखीचे झाली आणी त्यानंतर जन्मठेप समजली.
ताश्कंद करारात शास्त्रीजी सोबत फसवणूक होणार ह्याचा दाखला ह्या मुत्सद्दी माणसाने आधीच दिला होता पण दुर्दैव इथे पण सोबतीला आला आणी ताश्कंद मधे जे घडला त्याला जग साक्ष होता.
पु ल एकदा त्यांच्यावर भाषण करतांना म्हंटले होते की "ज्या खोलीत साक्षात तेजच वस्तीला येता तिचा गाभारा होतो"
(अंदमानातल्या खोलीबद्दल बोलताना ).
त्यांनी "६ सोनेरी पाने" लिहिली पण वास्तविकता अशी आहे की ह्या तेजस्वी मनुष्याने लिहिलेल प्रत्येक पान सोनेरी आहे, 
कुशाग्र बुद्धिमत्ता,  राजकारण आणी इतिहासाचा गाढ़ा अभ्यास, आणी तितकंच व्यासंगी लिखाण ह्यांचा समेट जिथे घडून येतो त्या व्यक्तीच नाव विनायक  
दामोदर सावरकर.

तेजस्वि नावधीतमस्तु..!

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

महाराज समजावे उमजावे आणि अमलात यावे...!

अवघा ५० वर्षे आयुष्य लाभला त्यांना
पण काम इतिहासाला लाजवेल आणि भविष्यातही भारताच नाव गाजवेल इतका मोठा...!पण त्यांना अभिप्रेत असलेला खरच आजचा भारत आहे का?की महाराज फक्त शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातनिवडणुकीच्या प्रचारात आणि जागोजागी उभारलेल्या रेखीव मुर्त्यानमधेच 
उरलेत.
पराक्रमाची साक्ष देणारा केसरी ध्वज आम्ही किती पटकन हिंदू धर्मीय केला आणि "हिंदवीस्वराज्याचा संस्थापक 
जो फक्त एका धर्माचा नाही तर रयतेचा राजा आहे त्याला आपोआप हिंदू राष्ट्राच्या चौकटीत बांधून आम्ही मोकळे झालो
ह्यावेळी ही चूक आपण वेळेवर ढकलू नाही शकत कारण हा वृत्ती चा दोष आहे ना की वेळेचा.४०० वर्षे होत आली तरी महाराज जयंती सोडल्यास बाक़ी वेळ राजकीय मुद्दा म्हणून जास्त चर्चिले जावे 
ह्यहून मोठा दुःख भारतीय समाजाच काय असावाअखंड स्वराज्यासाठी ज्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला शाहिस्तेखानाची चार बोट छाटली त्या महाराजानच्या भारताने नंतर अहिंसेच बिरूद मिरवण्यात धन्यता मानली.
(स्वातंत्र्या नंतर हे गाँधीजी ना ही अपेक्षित नव्हता आपल्या देशाच रक्षण हे आपण कराव ते ही ह्याच मताचे होते
आज गमावलेला तिबेट६२ साली चीनी लोकांनी आपल्या घरात घुसून आपल्या थोबाडित मारून जाण (अहिंसेच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांच्यात स्वरक्षणाची धमक असतेआणि पाकिस्तान सारख्यानी आपल्याला दररोज़ हल्ल्याची धमकी देणा 
ह्यहून हास्यास्पद काय आहे
अपमानासाठी रडत बसणे ह्याला पुरुषार्थ नसतात म्हणत तर कर्तृत्व सिद्ध करत अपमानाचा बदला घेतला जात असतोऔरंगजेबाच्या दरबारात अपमान झाल्यावर महाराजांनी किल्ल्याची कमान तोडून स्वराज्याच पुढचा पाऊल टाकला होता आणि बादशहा दरबारातल्या कुठल्याही मर्दाला असली हिम्मत दाखवता आली नव्हती आणि महाराजांनी अपमानाचा कसलाही गवगवा  करता आपला पराक्रम सिद्ध केला होतासन्मान ही पराक्रमाला मनातून मिळालेली पावती असते ती मागून मिळणारी गोष्ट नाहीएबाक़ी स्वातंत्र्यानंतर काळजात रुतलेला अपमानाचा खंजीर आपण कधीतरी काढून फेकूच पण त्याने जिव्हारी लागलेली जखम मिटनार नाही हे ही तितकच खरा
असो... इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे भावनेचा किंवा श्रद्धेचा नाही.
महाराज समजावे उमजावे आणि अमलात यावे हा हेतु आहे बाक़ी तथास्तू..

पुष्कर देशमुख