शनिवार, २ जानेवारी, २०१६

नटसम्राटास अर्पण....

प्रत्येक शब्दागनीक हृदयाला खाचा पडत होत्या
आणी भावनांशी खेळ होत होता
मान्य आहे पराभवाच्या जखमा
आणी विजयाचे झेंडे घेऊन गलबत पुन्हा बंदरातच उतरत
पण इतक का मनावर घेतला नाना...
की आमच्या सारख्या सामन्यालाही तुम्हाला टाळ्यांऐवजी
पाण्याने भरलेल्या डोळ्याने सलामी द्यावी लागली.
माझ्या शब्दांमधे इतक सामर्थ्य नसेलही
की मी लोकांच्या आसवांवर माझ्या दुःखाची पिका घेऊ
पण तुम्ही का फक्त 3 तास घेतले.....
होता तुम्हाला हक्क आम्हाला आणखीन रडवन्याचा
आमच्या आसवांनवर तुमच्या दुःखाची पीक घेण्याचा
माहीत नव्हता की माणसाच प्राक्तन
त्याला भविष्यात  अशा गर्तेत नेवून सोडत की
त्याच्या अवहेलनेला आयुष्याचा रंगमंच ही कमी पडतो
आणी मग जगावं की मराव हा एकच प्रश्न उरतो
to be or not be that is the question??
तुमचा तेही फारच आवडला नाना
भगदाड पडलेल्या तटबंदीला
कुठे जुन्या लढायांची आठवण करून  देता "सरकार "
काही म्हणा...
पण तुमच्या "सरकारने" मात्र मन मोहून टाकला
आणी त्या भाडखाव मित्राने पण...
विक्रम गोखले सराना मनातून सलाम.
नियतीने त्या नटासोबत केलेली कुचेष्टा
कदाचीत विधात्याला पुरेशी वाटली नाही
म्हणुन त्याने पुन्हा
आमच्या पिढीसाठी एका नटसम्राटाला पाठवला
पुन्हा असला कलाकार असली कलाक्रुती पाहण्याचा योग
डोळ्यांना मिळेल की नाही माहीत नाही
पण इतका मात्र मी ठाम आहे
ज्याने हजारो लाखो लोकांवर ज्याची कला गुलाल बुक्क्या प्रमाणे उधळली
तो गणपत रामचंद्र बेल्वल्कर तुम्हीच आहात
आणी तुम्हीच "नटसम्राट"
"नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही"

-अव्यक्त.... व्यक्त होताना
पुष्कर धनंजय देशमुख

६ टिप्पण्या:

  1. विजयाचे झेंडे घेउन गलबत पुन्हा निराशेच्या बंदरात उतरवणाऱ्या;भगदाड पडलेल्या जुन्या तटबंदीला; डोंगरदऱ्यामध्ये वणवण भटकानाऱ्या तुफानाला ज्याप्रमाणे शेवटपर्यंत "घर देत का कोणी घर...?" अस आर्त बोलाव लागल;अश्या महान नटसम्राटाला शब्दात उतरवने खुप कठीन.नटसम्राट 'गणपत रामचंद्र बेल्वल्कर' आणि ज्यांनी हा नटसम्राट 3 तासात प्रत्यक्षात उतरवला ते 'नाना'; मानाचा मुजरा.
    खरच,असा नट होनेच नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. Very well said pushkar.
    I could actually feel every word written in it.
    Damn touchy it is.
    Khupch Chhannn.

    उत्तर द्याहटवा