सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

प्रश्न माणुसकीचा आहे..

Unicef महासंचालक जिम ग्रँटने एका कुपोषित मुलाला प्रश्न विचारला "मोठ झाल्यावर काय बनण्याच तुझा स्वप्न आहे?"

ते मूल शांततेत म्हणाला "मोठ होईपर्यंत जिवंत राहण्याच माझ स्वप्न आहे"

National Family Health Survey च्या गेल्या वर्षीच्या नोंदणीनुसार महाराष्ट्रात अठरा हजार बालमृत्यू झाले तस पाहिला तर् हे आकडे कागदोपत्री आहेत वास्तविकता पन्नास हजारहून अधिक मृत्युच्या घरात आहे.

त्यांच्या सेवेसाठी जाणाऱ्या डॉक्टर्सना चार वर्षांपूर्वी केलेल्या एका योजनेनुसार एक लाख पगार आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी काही जागा राखीव ठेवण्यात येत होत्या पण हल्लीच हे आरक्षण बंद करण्यात आलं आहे.

आणि मग एक प्रश्न पडला इतकी मुलं आर्थिक परिस्थिती आभावी मरण पावतात ह्यांच्या जगण्यासाठी ह्यांच्या भविष्यासाठी आरक्षण ही तरतूद नाहीए का ह्यांच्यासाठी कुणी का लढत नाही स्वतःच्या हक्कांसाठी ही लोक का पुढे येत नाही मग एक महत्वाची गोम लक्षात आली की 

"कुपोषित ही जात नाहीए ती माणसं आहेत आणी आपल्याकडे जातीला आरक्षण असते शिवाय दोन वेळच पोट भरलेल्या सुशिक्षित लोकांना आरक्षण हवंय,दोन वेळची जेवणाची भ्रांत असलेले जीवनांच्या कल्पनांपासून अजुन मैलौ दूर आहेत"

अशिक्षितता, अंधश्रद्धा ह्यांनी ग्रासलेल्या समाजाच्या ह्या स्तराला वर् येऊ द्यायची संधी सुशिक्षित लोकच देऊ शकतात पण जर त्यासाठी विचार बदलावे लागतील की मला deserved व्हायचय reserved नाही जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ ह्या लोकांना घेता येईल सरकार समाजाच्या त्या घटकाकडे पण लक्ष देऊ शकेल.

आरक्षणाला विरोध नाहीए पण ज्यांना खरच गरज आहे त्यांना मिळाला तर् देश विकसनशीलतेची एक पायरी ओलांडून विकसित होईल आणी काही लोकांना असंही वाटेल की ही जबाबदारी सरकारची आहे तर् त्या सर्व बुद्धिप्रामाण्यवादी लोकांना विनंती की सरकार आपणच निवडून दिलय आणी निवडून दिला की जबाबदारी समाप्त होत नाही.

प्रत्येक गोष्टीची मांडणी जातीच्या अखत्यारीत करणे शक्य असेल तर थाम्बवा (सुशिक्षित लोकांना खास विनंती),

कारण जातीय दहशत आणी त्यामुळे होणारे वाद ह्यापेक्षा मोठा दहशतवादी प्रश्न देश सध्या सोडवत आहे.

#संवेदना

#भारतीय

#भारतमाताकीजय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा