बस मधून पाऊस पाहिला
मी परवा😁
आणि मग जाणवलं
आजकाल भिजावसं नाही वाटत 😊
कागदाच्या होड्या
चिखलातल्या उड्या
सारा अगदी आठवणींचा
गावाला सोडून आलोय 🙌🏻
आणी इथे घेऊन आलोय
एका मुखवटा 😅
जो दाटिवाटीने वागतो
आणि व्यक्त व्हायला आरसा मागतो 😉
हातात भोवरा फिरवता फिरवता
खुद्द भोवरा झालोय 😂
जगण्याच्या लपाछपीत
स्वतःहाला शोधण्यात
बावरा झालोय 😐
गणिताच्या पेपरपेक्षा
वेळेच गणित अवघड असता 😂
इथेच रोजच स्पर्धा आहे
कॉलेजात सगळ मस्त असत 😃
तिथे एक कटिंग चहाची
चव ओठांवर दिवसभर तरळते 😎
आणि आज चहा घेताना
घड्याळाची सुई पळते 😐
पण काय करणार
"शिकून मोठे व्हा"
ये जिंदगीका उसूल है 🙏🏻
"भरपूर पैसा छापला"
तो सबकुछ वसूल है 😂😂🙌🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा