बुधवार, २१ मार्च, २०१८

HENRY KISSINGER: एक निर्दयी व्यवहारिकता

एखाद्या व्यक्तीच्या सौँदर्याची भुरळ पडण्याचे दाखले आपल्या ला इतिहासात बऱ्याचदा पहायला मिळतात पण  बुद्दीमत्तेची भुरळ पडणे ह्याला वेगळे पण असाव लागता असा माझा वयक्तीक मत आहे.
१९२३ साली जर्मनी मधे ज्यू समाजात जन्माला आलेल्या ह्या व्यक्ती चे कुटुम्ब नाझी सरकार च्या अन्याया पासून स्वतःचा बचाव करण्याकरता जर्मनी सोडून पळून गेले आणी त्यानंतर १९७३ साली ह्या व्यक्तीला विएतनाम युद्ध रोखण्यात बजावलेल्या भूमिकेबद्दल शांतते चा नोबेल पुरस्कार मिळाला,  हेन्री किस्सिनजर त्याच नाव.
स्वतःचा जन्म ज्या देशात झाला त्याच देशाने आपल्या समाजावर इतका अन्याय करावा हे कुणाच्या ही मनात तेढ निर्माण करणारा च आहे आणी तसा पाहता ज्यू लोकांवर झालेल्या अन्यायाच्या बऱ्याच कथा आजही वाचायला मिळतात.गरीबी मुळे घराला हातभार लावण्याकरिता हेन्री एका कारखान्यात कामाला लागला आणी त्याच वेळी George Washington High School मधे त्याने नोंदणी केली होती. १९४० साली पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हेन्रीने Accountant होण्याची तयारी सुरू केली आणी त्यावेळी दुसरा महायुद्ध सुरू झालेला होता, १९४३ साली अमेरिकेच नागरिकत्व प्राप्त होताच त्याला अमेरिकन सैन्याकडून जर्मन सैन्या विरुद्ध लढण्यासाठी सहभागी करुन घेण्यात आला,ज्यांच्या अन्यायापासून बचाव करण्यासाठी जर्मनी सोडला होता आज त्याच जुलमी सरकार विरुद्ध लढण्यासाठी हेन्री उभा राहीला होता, फ्रांस मधे असताना युद्धात राइफलमन ची भूमिका त्याने पार पाडली आणी जर्मनी मधे इंटेलिजेन्स अधिकारी म्हणून त्याने काम पाहिला. युद्धाच्या ह्या काळात Accountant बनण्याचा विचार एव्हाना हेन्री ने डोक्यातून काढून टाकला होता आणी आता त्याने राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता आणी त्याचा तो निर्णय अमेरिकन राजकारणात परराष्ट्र धोरणाबाबतचा एक नवा आयाम ठरला.
१९५० साली राज्यशस्त्राचा शिक्षण पूर्णा झाल्यावर Harward मधेच राहून शासन विभागात  Ph.D करण्याचा निर्णय हेन्री ने घेतला, त्याच्या Ph.D च्या शोध प्रबंधाच नाव होता A World Restored: Metternich, Castlereagh and the Problems of Peace, 1812-1822.किस्सिनजरच्या धोरणात ऑस्ट्रियाच्या क्लेमेँस वॉन मेटरनीच आणी जर्मनीचा पाहिला चान्सेलर ऑट्टो वॉन बिस्मार्क चा प्रभाव दिसून येत असे.१९५४ साली शिक्षण पूर्ण झाल्यावर Harward विद्यापीठाच्या शासन विभागात नोकरी करण्याचा पर्याय किस्सिनजर ने स्वीकारला आणी त्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात येण्याची पहिली संधी त्याला मिळली १९५७ साली लिहिलेल्या ऐइसेनहोवर च्या सोविएत यूनियन विरुध्दच्या धोरणाला विरोध करणार्या पुस्तकांतून ज्याच नाव होता Nuclear Weapons And Foreign Policy. Harward विद्यापीठात कार्यरत असताना किस्सिनजर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष John F. kennedy आणी Lyndon B. Johnson चा परराष्ट्रीय धोरणात सल्लागार म्हणून पण काम करत असे.
१९६९ साली Richard Nixon राष्ट्राअध्यक्ष झाल्यावर हेन्री किस्सिनजर ची अमेरिकेचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आणी १९७५ साली त्याने राज्याचा सचिव म्हणून देखील काम पाहिला ज्याला अमेरिकेत Secretary of State असा सम्बोधतात.
आपल्या बुद्दीमत्तेच्या आणी मुत्सद्दीपणा च्या जोरावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार च्या कारकिर्दीत त्याने जगाला त्याची दखल घ्यायला लावली, त्यावेळी अमेरिका विएतनाम युद्धात गुंतलेला होता, अमेरिकेचा विएतनाम युद्धातला सहभाग अत्यंत क्लिष्ट मुद्दा आहे, Communist धार्जिण उत्तरी विएतनामच्या ताब्यात दक्षिण विएतनाम जाऊ नये ह्या हेतूने अमेरिका युद्धात उतरले हा दावा त्यातल्या त्यात खरा वाटतो आणी ज्यासाठी परराष्ट्र सम्बँधात वापरल्या जाणाऱ्या Domino Theory चा संदर्भ दिला जातो पण त्याचवेळी Gulf of Tonkin नावाची घटना ही अमेरिकेला युद्धात उतरायला कारणीभूत ठरली अस म्हंटल्या गेलंय पण तो युद्धात सामील होण्यासाठी रचलेला खोटा प्रकार होता असा म्हणतात, विएतनाम युद्ध ही  किस्सिनजर च्या परराष्ट्रीय धोरणाची खरी परीक्षा होती कारण त्यावेळी युद्धाच स्वरूप हे प्रचंड भीषण झाला होता, सन्मानासह शांतता ज्याला "Peace with Honor" असा म्हणतात ते प्राप्त करण्यासाठी किस्सिनजर ने बऱ्याच मार्गाचा अवलम्ब केला ज्यामुळे ह्या युद्धात २२००० अमेरिकी सैनिकांना आपला जीव गमवावा लागला, Defense Casualty Analysis System च्या The Vietnam Extract Data File नुसार  मृत अमेरिकन सैनिकांची संख्या ५८२२० आहे आणी विएतनामी लोकांची मृतसंख्या तर अगणित सांगितली जाते आणी अखेर १९७३ साली उत्तर विएतनामच्या Le Duc Tho आणी किस्सिनजर मधे युद्धबंदीचा करार झाला ज्यासाठी त्या दोघांना त्यावर्षीचा शांतते चा नोबेल पुरस्कार मिळाला पण विएतनाम च्या Duc ने त्याचा सम्पूर्ण हक्क्दार किस्सिनजर ला सांगत तो नाकारला. नोबेल मिळाला असला तरी किस्सिनजर च विएतनाम युद्धातली भूमिका ही प्रचंड वादग्रस्त ठरली आणी त्याला कारण होता त्याचा "Peace with Honor" चा आग्रह, ज्यासाठी तब्बल ४ वर्ष कित्तेक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

त्यानंतर त्याने कम्डोडिया देशात Communist Party of Kampuchea चा नेता Khmer Rouge ची राजवट आणण्यासाठी गुप्तपणे बॉम्बफेकी चा कार्यक्रम राभवला ज्याच स्वरूप प्रचंड विध्वसँक होता. १९७१ च्या काळात हेन्री ने Nixon च्या भेटीपूर्वी दोन वेळा चीन चा गुप्त दौरा केला चीन आणी अमेरिका सम्बंधात सुधार आणण्यातही त्याची भूमिका फार महत्वाची बोलली जाते.
शीतयुद्धाच्या काळात झालेल्या Strategic Arms Limitation Treaty आणी Anti-Ballistic Missile Trety ह्या दोन्ही वाटाघाटी च श्रेय हेन्री किस्सिनजर ला जाता ज्यामुळे त्यावेळच्या दोन महासत्तेमधला तणाव थोडाफार कमी व्हायला मदत झाली.
अक्टोबर १९७३ मधे ईस्राइल आणी ईजिप्त दरम्यान होऊ घातलेल्या Yom Kippur युद्धाला रोखन्यात हेन्री चा सहभाग हा अत्यंत महत्वाचा होता.१९७१ साली बांगलादेश च्या स्वातंत्र्यासाठी लढल्या गेलेल्या युद्धात भारताचा सहभाग हा अमेरिकेला पटला नव्हता आणी त्यावेळी किस्सिनजर ने पंतप्रधान इंदिरा गाँधी बद्दल अत्यंत वाईट शब्दाचा वापर केला होता, त्यांच्या रागाचं कारण भारत आणी कम्यूनिस्ट विचारसरणी च्या सोविएत रशिया मधली त्यावेळची वाढती जवळीक होती.
हुषार माणसा भोवती बऱ्याच वेळी वादाच वलय असता ह्याची उदाहरणे जगाच्या इतिहास आणी राजकारणात खूप पहायला मिळतात आणी त्यातच हेन्रीच नाव समाविष्ट होता, चिली मधे झालेल्या राष्ट्रअध्यक्षा च्या निवडणुकी मधे Chilean Socialist Party चा Salvador Allende ह्याची निवड ही अमेरिकेला न झेपनारी होती कारण होता त्याचा Cuba च्या राजकारणाप्रति असलेला झुकता माप, आणी त्यानंतर सत्तेत येताच चिली मधील अमेरिकन उद्योगाच त्याने केलेला राष्ट्रीयकरण. अमेरिकेने Allende ची सत्ता उलटवण्याचे बरेच प्रयत्न केले त्यासाठी सैन्याच्या उठावासाठी त्यांनी Central Inteigence Agency चा चिली मधे वापर केला आणी अशाच एका उठावा दरम्यान १९७३ साली Allende चा म्रुत्यू झाला आणी त्यानंतर राष्ट्राअध्यक्ष म्हणून सत्तेवर आला Augusto Pinochet जो त्या उठावावेळी चिली चा Army Commander-in-Chief होता. त्यानंतर २००० साली CIA ने जारी केलेल्या CIA Activites in Chilie ह्या कागदपत्राहून १९७३ साली झालेल्या सैन्य उठावात अमेरिकेने CIA माध्यमातून पाठिम्बा दिल्याच स्पष्ट झाला आणी आरोपांची सुई किस्सिनजर वर ही आली. नंतरच्या काही वर्षात म्हणजे १९७६ साली Pinnochet चा राजकीय विरोधक असलेल्या Orlando Letelier ची Washington D. C. ची एका Car बॉम्बस्फोटात हत्या झाली आणी ह्या घटने मधे Pinochet आणी किस्सिनजर चा सहभाग असल्याचे आरोप झाले.
तसा पाहता हा अत्यंत व्यापक विषय आहे, Christopher Hitchens ह्यांनी The Trial of Henry Kissinger नावाने ह्यावर लिखाण केला आहे आणी ह्याच नावाने माहितीपट देखील उपलब्ध आहे. १९७७ साली Gerald Ford राष्ट्राअध्यक्ष असताना किस्सिनजर Secretary of State ह्या पदाहून खाली उतरला तरी नंतरच्या काळात अमेरिकन परराष्ट्र धोरणात झालेल्या घडामोडीत किस्सिनजरचा सहभाग हा कायम राहीला

अतिशय मुत्सद्दी स्वभावाचा ह्या माणसाने निर्दयी व्यवहारिक धोरणाचा वापर करत परराष्ट्र धोरणात एक वेगळा आयाम रचला, ज्यासाठी त्याला बरेच सन्मान मिळाले आणी बऱ्याचदा टिकांना सामोरा जाव लागला, भविष्यात जेव्हा कधी परराष्ट्र धोरण आणी अंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय अभ्यासला जाईल त्यावेळी कदाचितच कुणी HENRY KISSINGER ह्या माणसाला डावलण्याची चूक करेल.



गुरुवार, १ मार्च, २०१८

"Why world is silent on Syria???"

शांततेचा हक्क त्यांना पण आहे पण गेल्या ८ वर्षा पासून तो नेहमीच नाकारल्या जातोय, ५ लाखाच्या घरात कत्तली केव्हाच घड्ल्यात आणि आजही घडत आहेत आणि सगळा जग सुन्न होऊन पाहत आहे. ह्याची सुरवात झाली १७ डिसेंबर २०१० साली मोहम्मद बोऊजिजि नामक ट्यूनिशियन फळ वीक्रेत्या ने स्वतःहला जाळून घेतल्यानंतर आणि मग २०११ साली हुकुमशहा तानाशहा विरुद्ध सुरू झालेला अरब स्प्रिंग नावाच आंदोलन केव्हा सीरिया च गृहयुद्ध बनला हे जगाला कळला नाही असा आपण म्हणुच शकत नाही.

८०% सुन्नी मुस्लिम असलेल्या देशात एक Alawite शीया मुस्लिम हूकूमशहा म्हणून वावरतोय हे १९७१ साला पासून जगाच्या राजकारणाने पाहिलय मग अचानक असा काय घडला की सीरीया मधे ची अराजकता माजली आणि आता जे घोउटा मधे घडतंय ते असा एकएकी घडला नाहीए. गोष्टी २०११ साली सुरू झाल्या आणि आज मृत लोकांचा आकडा ५ लाखा च्या घरात आहे  आणि नेहमी प्रमाणे आज पुन्हा प्रश्न विचारला जातोय


"Why world is silent on Syria???"

ट्युनिशीया मधे राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे यशस्वी आंदोलन झाला त्याच्या प्रेरणेतून बाकी अरब देशाला बदलाची चाहूल लागली आणि त्यापैकी च एक होता सीरिया, ज्याला बदल घडवण्याची इच्छा झाली खरी पण ट्युनिशिया च्या बेन अली किंवा ईजिप्त च्या होसनी मुबारक सारख राजीनामा देऊन पायउतार होण्याचा मार्ग सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर- अल- असद ने निवडला नाही आणि लीबियाच्या गद्दाफी सोबत जे घडला ते करण्यात ही सीरियन आंदोलकाना यश आला नाही.

पण त्यांच तेच अपयश पुढे सीरिया च गृहयुद्ध म्हणून आज जग पाहतय. 

अरब स्प्रिंग च्या समर्थनार्थ सीरिया मधे शांततेच्या मार्गाने सुरू झालेला आंदोलन चिरड्ण्यासाठी असद ने जवळपास शम्भर आंदोलकांची  कत्तल केली आणि किती तरी लोकांना तुरुंगात पाठवला आणि मग त्यानंतर सैन्यातल्या लोकांनी पक्षापाती धोरणाचा अवलम्ब करत "Free Syrian Army" नावाचा बंडखोर गट असद ची सत्ता उलथून टाकण्यासाठी स्थापन केला आणि त्यानंतर सुरू झाल सीरियन नागरी युद्ध (Syrian Civil War).

ह्या दरम्यान आंदोलन दडपण्यासाठी असद ने सेरेन नावाचा रसायना चा  प्रयोग केला आणि ज्यात ७०० लोकांना आपला जीव गमवावा लागला त्याची जगाने तिव्र निंदा केली. सुरवातीला देशांतर्गत असलेल्या ह्या आंदोलन चिघळायला खरा हातभार लावला तो बाहेरच्या देशांनी, आंदोलन तीव्र होऊन बशर अल असद ची सत्ता जाणार वाटत असताना त्याच्या मदतीला धावून आला व्लादिमिर पुतीन चा रशिया आणि मग ह्याच रशिया च्या सल्ल्याने असद ने ती रसायनीक हत्यारे Organisation for the Prohibition Of Chemical Weapons कडे सुपूर्द केली ज्यासाठी ह्या संस्थेला २०१३ सालचा शांतते चा नोबेल पुरस्कार देखील मिळाला त्याचवेळी शिया बहुसंख्य असलेल्या इराक़ आणि ईरान आणि लेबनान स्थित हेज्बोल्लाह गटाने असद ला आपला पाठिम्बा देऊ केला, पण आता गोष्ट हाताबाहेर गेली होती टर्की, कतर, सौदी अरेबिया आणि जॉर्डन सारख्या सुन्नी राष्ट्रानी असद विरोधात बंडखोरांना आपला पाठिम्बा द्यायला सुरवात केली होती आणि अमेरिकेने असद विरोधी गटाला हत्यारांची मदत करायला सुरवात केली आणी त्याचवेळी  इराक़ मधे स्थापन झालेल्या कट्टर इस्लामवादी  ISIS किंवा   ISIL गट म्हणूया आणी अल- कायदा चा भाग राहिलेले जभात- अल- नसरा आणी जभात फतेह अल- शाम असल्या कट्टर पंथी गटांनी तोवर सीरियन नागरी युद्धात आपले पाय रोवले होते.


ह्या मधे आणखीन एक गट स्वतःह च्या सामाजिक महत्वाकांक्षा घेऊन सीरिया च्या उत्तर भागात झटत होता जो होता कुर्द लोकांचा ज्यांच पहिल्या महायुद्धानंतर तीन राष्ट्रांत विभाजन झाला होता ज्यांना स्वतःहच कुर्दीस्तान हवा होता आणी त्यांच्या विरोधात उभा ठाकला होता टर्की ज्याचा ह्या गोष्टीला नेहमीच विरोध होता.


सारा काही स्वतःहच्या महत्वाकांक्षा आणी सोयीसाठी सुरू झाला आणी आजही तसच सुरू आहे, रशिया आणी अमेरिका सारख्या प्रगत देशांनी स्वतःहच सामर्थ्य आणी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ह्या देशांचा त्यांच्या धार्मिक अस्मितेचा पुरेपूर वापर केला आणी आज ही करत आहेत आणी ह्यात भरडला जातोय तो सीरिया चा सामान्य समाज.

सामन्याबद्दल आम्हांला किती कळवळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हे सर्व राजकारणी नेहमीच करत आलेत पण ज्या ज्यावेळी सीरिया बद्दल काही निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळी रशिया आणी चीन ह्यांनी आपला नकाराधिकार वापरून हे सीरिया नावाच घोन्गड भिजत ठेवण्याला प्राधान्य दिला हा असला दुटप्पीपणा कदचीत त्यांच्या फायद्याचा असेलही पण आजवर जो अत्याचार घडलाय, घडत आहे त्याला जबाबदार कोण ह्याच उत्तर कधी मिळेल, ज्यांनी जीव गमावले त्यांना न्याय मिळण्याच राहीला पण जे जगत आहेत त्यांच्या जगण्याच्या हक्काचा कुणी बोलणार आहे का की सगळे मूग गिळून सीरिया मधे वाईट घडत आहे म्हणून शांतच बसणार आहेत.

खरच सीरिया बाबत जग का शांत आहे???

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

तेजस्वि नावधीतमस्तु..!

त्यावेळी त्यांच वय होता अवघा ३० वर्षे आणी ब्रिटिश सरकारने त्यांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली वर्ष १९११ पासून ते १९६० पर्यंत.
तसा पाहता कुठलीही सामान्य व्यक्ति हे ऐकताच कोलमडून पडली असती पण हा मनुष्य भर कोर्टात म्हणतो Are you sure British will rule India upto 1960?
इतका धाडस की ज्यांनी आपल्या नाकावर टिच्चुन १५० वर्ष राज्य केला त्यांच्या साम्राज्याच्या अस्तित्वावर हा माणूस थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणी १९४७ ला भारत स्वातंत्र्य होतो तसा पाहता हा माणूस जिंकला म्हणायला हरकत नाही पण स्वातंत्र्य भारतच दुर्दैव की आम्हा भारतीयांना हा स्वातंत्र्यवीर कधी समजून घ्यावाच वाटलाच नाही, आधी एका धर्माचा शिलेदार म्हणून आमच्या इतिहासाने त्याला हिणवला आणी त्यात भर म्हणजे स्वांतंत्र्य मिळाल्यावर ही त्यांच्या घरच्यांना त्यांच्या सम्पत्तिची मालकी मिळवून देण्यात पण आमच सरकार अपयशी ठरला सगळंच दुर्दैव तसा पाहता.
पण...हा माणूस हरला नाही ते म्हणतात ना सूर्याला कधी ग्रहण लागत नसता तर तो पाहणाऱ्या च्या नजरेचा दोष असतो काहीसं तसच ह्या माणसाबाबत म्हणावं लागेल.
अंदमानातल्या त्या खोलीत शिक्षा सहन करत असताना ही ह्या माणसाच् देशप्रेम तिळमात्र कमी झाला नाही आणी तिथे सुद्धा ह्या माणसाने कितीतरी अजरामर काव्य लिहिली.
"ने मजसी ने परत मातृभुमिला सागरा प्राण तळमळला" ह्या कवितेतून पहिल्यांदा सावरकर शाळेत ओळखीचे झाली आणी त्यानंतर जन्मठेप समजली.
ताश्कंद करारात शास्त्रीजी सोबत फसवणूक होणार ह्याचा दाखला ह्या मुत्सद्दी माणसाने आधीच दिला होता पण दुर्दैव इथे पण सोबतीला आला आणी ताश्कंद मधे जे घडला त्याला जग साक्ष होता.
पु ल एकदा त्यांच्यावर भाषण करतांना म्हंटले होते की "ज्या खोलीत साक्षात तेजच वस्तीला येता तिचा गाभारा होतो"
(अंदमानातल्या खोलीबद्दल बोलताना ).
त्यांनी "६ सोनेरी पाने" लिहिली पण वास्तविकता अशी आहे की ह्या तेजस्वी मनुष्याने लिहिलेल प्रत्येक पान सोनेरी आहे, 
कुशाग्र बुद्धिमत्ता,  राजकारण आणी इतिहासाचा गाढ़ा अभ्यास, आणी तितकंच व्यासंगी लिखाण ह्यांचा समेट जिथे घडून येतो त्या व्यक्तीच नाव विनायक  
दामोदर सावरकर.

तेजस्वि नावधीतमस्तु..!

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

महाराज समजावे उमजावे आणि अमलात यावे...!

अवघा ५० वर्षे आयुष्य लाभला त्यांना
पण काम इतिहासाला लाजवेल आणि भविष्यातही भारताच नाव गाजवेल इतका मोठा...!पण त्यांना अभिप्रेत असलेला खरच आजचा भारत आहे का?की महाराज फक्त शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातनिवडणुकीच्या प्रचारात आणि जागोजागी उभारलेल्या रेखीव मुर्त्यानमधेच 
उरलेत.
पराक्रमाची साक्ष देणारा केसरी ध्वज आम्ही किती पटकन हिंदू धर्मीय केला आणि "हिंदवीस्वराज्याचा संस्थापक 
जो फक्त एका धर्माचा नाही तर रयतेचा राजा आहे त्याला आपोआप हिंदू राष्ट्राच्या चौकटीत बांधून आम्ही मोकळे झालो
ह्यावेळी ही चूक आपण वेळेवर ढकलू नाही शकत कारण हा वृत्ती चा दोष आहे ना की वेळेचा.४०० वर्षे होत आली तरी महाराज जयंती सोडल्यास बाक़ी वेळ राजकीय मुद्दा म्हणून जास्त चर्चिले जावे 
ह्यहून मोठा दुःख भारतीय समाजाच काय असावाअखंड स्वराज्यासाठी ज्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला शाहिस्तेखानाची चार बोट छाटली त्या महाराजानच्या भारताने नंतर अहिंसेच बिरूद मिरवण्यात धन्यता मानली.
(स्वातंत्र्या नंतर हे गाँधीजी ना ही अपेक्षित नव्हता आपल्या देशाच रक्षण हे आपण कराव ते ही ह्याच मताचे होते
आज गमावलेला तिबेट६२ साली चीनी लोकांनी आपल्या घरात घुसून आपल्या थोबाडित मारून जाण (अहिंसेच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांच्यात स्वरक्षणाची धमक असतेआणि पाकिस्तान सारख्यानी आपल्याला दररोज़ हल्ल्याची धमकी देणा 
ह्यहून हास्यास्पद काय आहे
अपमानासाठी रडत बसणे ह्याला पुरुषार्थ नसतात म्हणत तर कर्तृत्व सिद्ध करत अपमानाचा बदला घेतला जात असतोऔरंगजेबाच्या दरबारात अपमान झाल्यावर महाराजांनी किल्ल्याची कमान तोडून स्वराज्याच पुढचा पाऊल टाकला होता आणि बादशहा दरबारातल्या कुठल्याही मर्दाला असली हिम्मत दाखवता आली नव्हती आणि महाराजांनी अपमानाचा कसलाही गवगवा  करता आपला पराक्रम सिद्ध केला होतासन्मान ही पराक्रमाला मनातून मिळालेली पावती असते ती मागून मिळणारी गोष्ट नाहीएबाक़ी स्वातंत्र्यानंतर काळजात रुतलेला अपमानाचा खंजीर आपण कधीतरी काढून फेकूच पण त्याने जिव्हारी लागलेली जखम मिटनार नाही हे ही तितकच खरा
असो... इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे भावनेचा किंवा श्रद्धेचा नाही.
महाराज समजावे उमजावे आणि अमलात यावे हा हेतु आहे बाक़ी तथास्तू..

पुष्कर देशमुख


शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

"Beauty lies in the eyes of the beholder"


गोष्ट इराक मधे घडली होती,

त्या दोघी बहिणी इराक मधे ५ दिवसांसाठी कसल्या तरी कामानिमित्त गेल्या होत्या, एका धार्मिक ठिकाणी त्यांना भेट द्यायची होती, पण तिथली सकाळची  एकंदरीत गर्दी पाहता त्यांनी दुपारी जाण्याचं
ठरवला, हॉटेल मधली सगळी आवाराआवर करून त्या दोघी त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्या, त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता हा भर बाजारातून जात असे, पुढे जात असताना त्यांना एक १२ वर्षाचा मुलगा T shirts विकताना दिसला, त्याचा चेहरा अगदी धूळीने माखलेला आणि कपड़े अगदी मळलेले होते, तो अरबी भाषेत ओरडत होता " T shirt लेलो २००० इराकी में ५ T shirts लेलो" त्यातल्या एका बहिणीला अरबी भाषा कळत होती, त्या दोघीनी आपसात चर्चा केली की जाऊन तर पाहूयात कसे आहेत कपड़े आणि मग त्या पाहू लागल्या, किम्मती ची विचारपूस करत असताना एक बहीण म्हणाली, चल आपल्याला उशीर होतोय आणि त्या पुढे जाऊ लागल्या तर तो मुलगा पळत मागे येत म्हणाला " क्या हुआ, कितने पैसे दे सकते हो आप" त्या दोघी आपसात ठरवून हजार इराकी असा म्हंटल्या, त्यावर तो उत्तरला की हजार मधे माझी मूद्दल देखील निघणार नाही जास्तीत जास्त मी १७०० इराकी करु शकेल, त्यांनी चर्चा केली आणि त्यांना वाटलं कपड़ा तसा छान आहे घ्यायला हरकत नाही म्हणून त्यांनी ते T shirts घेतले आणि त्याला पैसे देऊ केले त्यानंतर त्याला कमालीचा आनंद झाला होता, त्याच्या चेह्र्यावरची धूळ वगेरे क्षणभर अगदी गायब झाली होती, त्याचा आनंद त्याच्या डोळ्यात साफ दिसत होता त्यावर एका बहिणीने विचारलं "लागता है दिन की बिसमिल्ला अभी हुई है तुम्हारी" त्या दोघी एका व्यापारी घरातून होत्या त्यामुळे त्यांना रोजच्या व्यवसायाचं काय असता हे ठाऊक होता कधी कधी एक दिवस तर कधी कधी आठवडाभर सुद्धा पैसे मिळत नसे, मग तो मुलगा म्हणाला " नही mam दिन की नही हफ्ते की हुई है" क्षण भर दोघीही सुन्न झाल्या होत्या, मग त्यातल्या एकीने त्याला विचारला तुझ्या घरी घरी कोण कोण असता त्यावर तो म्हणाला, "मै,मेरी एक छोटी बहन और अम्मी, मै पैसे कमाकर मेरी बहन कॊ school भेजता हूँ" न् राहून एका बहिणीने पुन्हा प्रश्न विचारला "तुम्हारे अब्बा, तुम्हारे वालीद साहब नही है" त्यावर तो म्हणाला की "कुछ दिन पहेले दूर मेरे गाँव में कुछ लोग आये थे बड़े सें काले कपड़े पहेने थे उन्होने मेरे अब्बा में माथे पे गोली मार दी" हे ऐकताच दोघी बहिणीना गहिवरुण आला आणि एक बहीण त्याला थाम्ब म्हणत पळत हॉटेल मधून काही खायच्या गोष्टी घेऊन आली आणि त्याला देऊ केल्या त्यावर तो म्हणाला "आज अम्मी बहोत खुश होगी ये मेरे हफ्तेभर का खाना हो गया" त्यांना ते ऐकून खूप आनंद झाला कारण ते म्हणतात ना "कुणा भुकेल्या व्यक्तीच पोट भरला की तो मनातून आशीर्वाद देतो", तो जाता जाता त्यांना म्हणाला की " मै दुआ करूँगा उस मौला अली सें जिसके दर पर तुम आये हो की वो तुम्हारी  सारी दुआए जल्दी मंजूर करदे" ते ऐकून त्या आनंदाने पुढे गेल्या आणि म्हणाल्या की "आज अपने वतन सें दूर आये है तो अपनी हिंदुस्तान की हजमत पता चली" खरचं ह्यात काहीही दुमत नाहीए  की " जर आपणच आपल्या देशाचं सौंदर्य पाहू शकत नसू तर इतर लोक कसे पहतील"😅🙌🏻

#LexHindustan
#अनुवाद
#अव्यक्तव्यक्तकरताना