मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

"जिंदगीका सबक"

मैने जिंदगी को हारते देखा था 

जब हौसले टूटने लगे 😅

हँसी को रुठ्ते देखा था 

जब ख्वाब छूटने लगे 😁

महेज एक वक्त ही था 

जो बदल रहा था 😃

मैने हालात बिघडते देखा था 

जब उम्मीद मिटने लगे 🙂

मैने मंदीर सजते देखा था 

जब हार बढ़ने लगे 😀

मैने दर्गापे चादर देखी थी 

जब जरूरते बढ़ने लगे 😀

मैने बचपन की याद देखी थी 

जब पैसे कमाने लगे 🤓

मैने गरीबी मेहसूस की 

जब फुटपाथ चमकने लगे 😑

सूरज भी जाता था 

जब दिन ढलने लगे 😅

नादानीया थी सबकुछ 

बस एकही सबक था 😃

"जिंदगी अपने कंधोंपे चलती है 

दूसरो के कंधोंपे तो जनाजे उठते है" 😀😀

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

जिंदगी का उसूल..

बस मधून पाऊस पाहिला 

मी परवा😁

आणि मग जाणवलं

आजकाल भिजावसं नाही वाटत 😊

कागदाच्या होड्या 

चिखलातल्या उड्या 

सारा अगदी आठवणींचा 

गावाला सोडून आलोय 🙌🏻

आणी इथे घेऊन आलोय 

एका मुखवटा 😅

जो दाटिवाटीने वागतो 

आणि व्यक्त व्हायला आरसा मागतो 😉

हातात भोवरा फिरवता फिरवता 

खुद्द भोवरा झालोय 😂

जगण्याच्या लपाछपीत 

स्वतःहाला शोधण्यात

बावरा झालोय 😐

गणिताच्या पेपरपेक्षा 

वेळेच गणित अवघड असता 😂

इथेच रोजच स्पर्धा आहे 

कॉलेजात सगळ मस्त असत 😃

तिथे एक कटिंग चहाची 

चव ओठांवर दिवसभर तरळते 😎

आणि आज चहा घेताना 

घड्याळाची सुई पळते 😐

पण काय करणार 

"शिकून मोठे व्हा"

ये जिंदगीका उसूल है 🙏🏻

"भरपूर पैसा छापला"

तो सबकुछ वसूल है 😂😂🙌🏻

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

प्रश्न माणुसकीचा आहे..

Unicef महासंचालक जिम ग्रँटने एका कुपोषित मुलाला प्रश्न विचारला "मोठ झाल्यावर काय बनण्याच तुझा स्वप्न आहे?"

ते मूल शांततेत म्हणाला "मोठ होईपर्यंत जिवंत राहण्याच माझ स्वप्न आहे"

National Family Health Survey च्या गेल्या वर्षीच्या नोंदणीनुसार महाराष्ट्रात अठरा हजार बालमृत्यू झाले तस पाहिला तर् हे आकडे कागदोपत्री आहेत वास्तविकता पन्नास हजारहून अधिक मृत्युच्या घरात आहे.

त्यांच्या सेवेसाठी जाणाऱ्या डॉक्टर्सना चार वर्षांपूर्वी केलेल्या एका योजनेनुसार एक लाख पगार आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी काही जागा राखीव ठेवण्यात येत होत्या पण हल्लीच हे आरक्षण बंद करण्यात आलं आहे.

आणि मग एक प्रश्न पडला इतकी मुलं आर्थिक परिस्थिती आभावी मरण पावतात ह्यांच्या जगण्यासाठी ह्यांच्या भविष्यासाठी आरक्षण ही तरतूद नाहीए का ह्यांच्यासाठी कुणी का लढत नाही स्वतःच्या हक्कांसाठी ही लोक का पुढे येत नाही मग एक महत्वाची गोम लक्षात आली की 

"कुपोषित ही जात नाहीए ती माणसं आहेत आणी आपल्याकडे जातीला आरक्षण असते शिवाय दोन वेळच पोट भरलेल्या सुशिक्षित लोकांना आरक्षण हवंय,दोन वेळची जेवणाची भ्रांत असलेले जीवनांच्या कल्पनांपासून अजुन मैलौ दूर आहेत"

अशिक्षितता, अंधश्रद्धा ह्यांनी ग्रासलेल्या समाजाच्या ह्या स्तराला वर् येऊ द्यायची संधी सुशिक्षित लोकच देऊ शकतात पण जर त्यासाठी विचार बदलावे लागतील की मला deserved व्हायचय reserved नाही जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ ह्या लोकांना घेता येईल सरकार समाजाच्या त्या घटकाकडे पण लक्ष देऊ शकेल.

आरक्षणाला विरोध नाहीए पण ज्यांना खरच गरज आहे त्यांना मिळाला तर् देश विकसनशीलतेची एक पायरी ओलांडून विकसित होईल आणी काही लोकांना असंही वाटेल की ही जबाबदारी सरकारची आहे तर् त्या सर्व बुद्धिप्रामाण्यवादी लोकांना विनंती की सरकार आपणच निवडून दिलय आणी निवडून दिला की जबाबदारी समाप्त होत नाही.

प्रत्येक गोष्टीची मांडणी जातीच्या अखत्यारीत करणे शक्य असेल तर थाम्बवा (सुशिक्षित लोकांना खास विनंती),

कारण जातीय दहशत आणी त्यामुळे होणारे वाद ह्यापेक्षा मोठा दहशतवादी प्रश्न देश सध्या सोडवत आहे.

#संवेदना

#भारतीय

#भारतमाताकीजय

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

मी आधी भारतीय आहे म्हणून..!

"मी आधी भारतीय आहे म्हणून"🙏🏻🙏🏻

देशाचे पंतप्रधान आणी आपले डिफेन्स सेक्यूरिटी अड्वाइज़र्स युद्धखोर् आहेत असा साक्षात्कार आज देशाच्या एका मोठ्या नेत्याला अचानक झाला आणी आमच्या सरकारने पण surgical strike केल्या होत्या हे पण आठवल, म्हणजे किती केविलवाणा प्रयत्न होता चर्चेत येण्याचा.  😃😃😃

दुसरीकडे काही बुद्धिवादी लोकांना आपले 18सैनिक मारले गेल्यावरही अहिंसेच्या मार्गाने प्रश्न सोडता आला असता अस वाटत म्हणजे अचानक सगळा झाल्यावर लोकांना तोड्गे सुचतात कसे कळत नाही.  😃😃😃

देशाचे सैनिक मारले गेले होते त्याची निंदा करणे कलाकारांना सहज शक्य होत ज्यांनी केली नाही त्यांच्यावर बंदी आणली तर अचानक काही लोकांना पुळका येतो की ते कलाकार आहेत, 

मुळात 100 करोड़ कमावणारे चित्रपट बनवले की कुणी कलाकार हया श्रेणीत बसत असेल तर देशाची कला संस्कृति धोक्यात आहे म्हणता येईल.  😃😃😃

ह्या सगळ्या गोष्टीमधे  एक मुद्दा कळला नाही की अचानक देशात इतके बुद्धिजीवी लोक कुठुन आले.  😃😃😃

"देशाच्या सैनिकांना" आरक्षण नसता तरी ते देशाच रक्षण करत आहेत मुळे जर प्रोत्साहन शक्य नसेल तर देशाच आवसान घालवू नका. 🙏🏻🙏🏻🙏🏻

राहिला प्रश्न पाकिस्तानचा तर भारतीय लोक jio च् मोफत नेट वापरतात तरी कुणाला hotspot देत नाही आणी ह्यांना कश्मीर हवाय ***** *** 😃😃😃

#Respect

#Love

#Indianarmy

#भारतमाताकीजय....! 🙏🏻🙏🏻🙏🏻

अव्यक्त...व्यक्त करताना

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

"और राही फिरसे मील गया"

"मी तुमच्या सोबत dance करू शकतो का??"

अगदी सद्गृहस्था सारख चेहऱ्यावर मंदस्मित ठेवत अगदी विश्वासाने हात पुढे करत दिगंतने राहीला विचारला.

"Sure" अस म्हणत हसत हसत तीनेही हात पुढे केला.

आणी तिचा हात अलगद हातात घेत दिगंत तिला नृत्यमंचावर घेऊन गेला.

आणि मग तितक्यात एका सुंदर गाण्यावर दोघं dance करू लागले.

"तुम्ही फार छान व्यक्ति आहात"अशी प्रतिक्रिया तितक्यात तीने दिली 

"अच्छा, म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीला नृत्याकरिता विचारलं त्याबदल्यात मला ही प्रतिक्रिया मिळालेली दिसतेय" असं म्हणत तोही हसला 

"तुमचं बोलणं तुमच्या वागण्याइतकंच प्रभावी आहे" असं म्हणत ती पुन्हा हसू लागली 

"पण तुमच्या नवऱ्याला कदाचित तसं वाटलेला दिसत नाही"

अस म्हणत तो तिच्या जवळ आला आणी म्हणाला "मघाशी मी तुम्हाला नृत्यासाठी विचारलं तेंव्हापासून त्यांची नजर माझावरच घोटाळतेय"

"त्याची काळजी करू नका थोडासा राग आला असेल"अस हसत हसत राही म्हणाली

"हो साहजिक आहे, आणी शिवाय तुम्ही माझापेक्षा जास्त त्यांना ओळखतात" दिगंत हसून म्हणाला 

"त्याकडे फारसा लक्ष देऊ नका" अस म्हणत राही म्हणाली "आता ह्याक्षणी तो हातातल्या काट्या चमचाने उगाच table कडे पाहत दातओठ खात असेल आणी आपल्याकडे अशा चोरट्या नजरेने पाहत असेल जणु काही तो आपल्याला पाहतच नाहीए आणी त्याला काही फरक पडला नाहीए"

राहीच म्हणणं तपासन्याकरीता दिगंतने मान वळवली आणी तो आश्चर्याने थक्क झाला.

कारण राही अगदी बरोबर म्हणाली होती.

आणी तितक्यात गाणं सम्पला आणी दिगंतने राहीला तिच्या table पर्यंत नेऊन सोडला आणी नृत्याबद्द्ल thank you म्हणत तिच्या हाताच चुम्बन घेत तो निघाला 

पुढे होत दिगंत राहीच्या नवऱ्याला म्हणाला "तुम्ही फार नशीबवान आहात तुम्हाला इतकी सुंदर बायको मिळाली"

"Mr.??? तुमचं नाव ठाऊक नाहीए मला "

"अन्वय. Mr. अन्वय " 

"तुम्हाला भेटून छान वाटलं" अस म्हणत दिगंतने त्यांचा निरोप घेतला.

"किती गोड मुलगा आहे" राही म्हणाली 

"गोड"?? त्याचा चेहरा पाहीलास, अस वाटत होत की कित्येक मुलींना तो फसवत असेल, आणी तसंही तुझ्यासाठी मी सोडून सगळेच गोड असतात हो ना?? अन्वय म्हणाला 

"मुलींना फसवत असेल???" अन्वय अरे मी ७० वर्षान्ची झालीय आता, कुठला तरुण मुलगा माझी का फसवणूक करेल आणी शिवाय त्याने माझ्या सौंदर्याची तारीफ केलीय त्यामुळे मला आज एकदम तरुण झाल्यासारख वाटतय आणी आपल्या लग्नाला ४५ वर्ष होत आहेत् त्यामुळे इतक जळण्याची गरज नाहीए" अस राही हसत हसत म्हणाली.

"तरुण???सुंदर?कालपर्यंत कुणीतरी आपल्या थकलेल्या शरीराबाबत आणी अंगावरल्या सूर्कूत्या बद्दल तक्रार करत होता आणी आज अचानक सुंदर वाटू लागलय" अन्वय म्हणाला 

"हो पण ते काल वाटत होता आज नाही आणी राजा  आपण इथे जेवायला आलोय तर् खायला काही मागवूयात का??मला फार भूक लागलीय please??" राही म्हणाली 

"हो पण एका अटीवर की तु मला promise कर् की यानंतर तु माझ्याशिवाय  दुसऱ्या कुणासोबत dance करणार नाहीस??"अन्वय म्हणाला 

"हो बाबा हो" राही हसत हसत म्हणाली आणी हळुच अन्वय जवळ जात म्हणाली "मला फार छान वाटला की कुणी दुसऱ्याने माझा हात हातात घेतल्यावर तू असुरक्षित झाला हे  पाहून" आणी राही एकदम खळखळून हसली.

"असुरक्षित??आणी मी??काहीही ते उगा आपला असचं. जाऊदे सोड जेवण मागवुयात" अन्वय म्हणाला

आणी त्यानंतर दोघांनी एकदम आनंदात candlelight dinner केला.

त्यनंतर रात्री दिगंतच्या मोबाइल वर एक मेसेज आला 

"Thanks दिगंत, राही आज एकदम खुष झाली आणी शिवाय पुन्हा माझ्या जुन्या राहीचा विश्वास आज पुन्हा आला, तु केलसं त्याबद्दल खरच खुप आभार"

"काका तुम्ही सांगितला तसंच मी केला, बाकी आपका राही आपको राही फिरसे मिल गया"😃😃

#कुछपढ़ीसीबाते

#कुछलिखीसीबाते

#अनुवाद

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

"आनंदाच औषध????"

काल कानात हेडफोनस घालून नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला निघालो साधारण 10 वाजत आले असावेत आणी समोरच्या बाजूला असलेल्या सरकारी शाळेसमोरच्या बसस्टॉप जवळ जाऊन उभा राहिलो , शाळा सुरु होण्यासाठी थोडासाच वेळ असावा कदाचित म्हणून तिथे लहान मुलांची आणी त्यांना सोडवायला येणाऱ्या पालकांची वर्दळ दिसत होती, फेरीवाले आणी कामावर जाणारी लोक,ऑटो ह्यामुळे परिसर अगदी गजबजलेला होता.
बस यायला वेळ असल्याने साहजिकच रस्त्यांवरची गडबड पाहत वेळ काढत होतो आणी तितक्यात नजर एका महीलेवर गेली साधारण 20 22 वर्षांची असावी,कडेवर बाळ घेऊन दुसऱ्या खांद्यावर शाळेची बॅग अडकवलेली ती आपल्या लहान मुलीला शाळेत सोडवायला आलेली होती, साधारण 5 वर्षांची ती मुलगी आपल्या आईच हाताच बोट पकडून शाळा सुरु होण्याची वाट पाहत उभी होती.
विश्वास ठेवावा की नाही अस दृश्य होता ते 
ज्या महिलेचा उल्लेख मी करत होतो ती दिसायला अगदीच भीक मागणार्या लोकांसारखी दिसत होती, अनवाणी पायानेच ती आपल्या मुलीला शाळेत सोडवायला आली होती केस विस्कटलेले आणी मळलेले कपड़े, कडेवर असलेल्या बाळाचे कपड़ेही मातीने माखलेले दिसत होते आणी शाळेत जाणाऱ्या मुलीने शाळेचा गणवेष घातलेला होता पण बूट मात्र तिच्या पायात नव्हते. फार हालाखीच्या परीस्तीथीत दिवस काढत असावे असा एकंदरीत अंदाज एव्हाना मला आला होता.
फार वाईट वाटणार किंवा किव यावी अस दृश्य होता म्हणता येईल पण अचानक आठवला की मी काहीतरी पहायला विसरलो होतो???
हो...त्या चेहऱ्यावरच हासु 
त्या आईच्या त्या बाळाच्या आणी त्या शाळेत जाणाऱ्या मुलीच्या, ते हासु ज्यामुळे ते बाकी लोकांपेक्षा जास्त सुंदर दिसत होते.
आणी हो मला वाटत मी पाहिलेला तो अत्यंत सुंदर क्षण होता, ज्यात त्या आईने प्राप्त परिस्थिती मध्ये आपल्या लेकरांना हसायला शिकवलं होता, ती मुलगी आनंदाने उड्या मारत चालत होती आणी शाळेला जाण्यासाठी तिच्या आईच हातचं बोट ओढत होती, मग हळुच आईने बोट सोडत तिच्या हातात काहीतरी दिला कदाचित खाऊसाठी पैसे दिले असावे आणी मुलीचा पापा घेत ती पुन्हा निघाली.
न राहून मी सामोरा होत तिला विचारला 
"तुम्ही त्या डेपोपसल्या झोपड़पट्टीत राहतात का"
आणि तीने गर्वाने उत्तर दिला "हो"
(कुणीतरी कनाखाली जाळ काढावा अस झाला क्षणभर)
"आणी ह्या माझ्या पोरी हायेत, एक शाळत जाते, म्या सकाळच्याला सोडायला येते आणी साँच्याला घ्यायला बी येते"
पुढला प्रश्न विचार्ण्यापूर्वी ती दीसेनासी झाली होती 
आणी मी मलाच दिसेनासा झालो होतो.
बरेच प्रश्न अनुत्तरित होते..आणी कदाचित राहतील ही 
जसे 
"जगण्याची इतकी जिद्द तिला कुठुन येते??"
"उन्हात पाय भाजत असताना तिला कुठली इच्छाशक्ति इतकी दूर अनवाणी चालत आणते???"
"असा आनंदाच कुठला औषध तिला गवसला आहे??"
मग वाटलं आपण किती क्षुल्लक आहोत 
तिच्यापेक्षा तर् जास्तच सुखसुविधा आपल्याकडे होत्या आणी आपण मात्र कीत्थे गीरवन्यात वेळ घालवतो की 
"जीवन आपल्याशी किती अयोग्य वागतय"
आणी मग त्या वेळेला सन्धीत बदलायच राहून जाता,
सार् अगदी धूसर झाला होता काही वेळासाठी आणी
मी....
मी सुद्धा अगदी धूसर
#कुछपढ़ीसीबाते
#कुछलिखीसीबाते
-अव्यक्त....व्यक्त करताना

मंगळवार, १९ जुलै, २०१६

लाज वाटतेय..

लाज वाटतेय..
कोपर्डी बलत्कराबद्द्ल वाचून
पण त्याहून जास्त लाज वाटतेय
पेपर मधील बातम्या पाहून की
"आज ह्या पक्षाच्या ह्या ह्या कार्यकर्त्यानी सत्ताधारी पक्षाच्या ह्या नेत्यांची भेट घेऊन किंवा अमुक जिल्हा अधिकार्यांची किंवा पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन कोपर्डी बलात्कार प्रकरणात त्या मुलीला आणी तिच्या घरच्यांना न्याय मिळावा आणी गुन्हेगाराना कडक शिक्षा व्हावी ह्यासाठी निवेदन दिले"
किती ती धडपड पेपर मध्ये नाव येण्यासाठी आणी आम्ही किती सामाजीक दृष्ट्या जागरूक आहोत दाखवण्याची"माणसाच्या शरीराची झालेली विटम्बना पण राजकारणाचा किंवा चर्चेत येण्याचा विषय आहे का मग त्याला जमल तर जातीय रंग द्यायलाही मागे पुढे पहायला नको" 
कुणीतरी आपली मुलगी गमावलीय कुणीतरी बहीण गमावलीय कुणीतरी मैत्रीण देखील गमावली असेल,
पण नाही ह्याशी आमच देणघेण नाही आम्ही आंदोलन करणार. 
करा ना आंदोलन करा राग व्यक्त करा
पण त्यासाठी कुठला पक्ष किंवा पेपर मध्ये आंदोलनात हे उपस्थित होते हे छापून यायलाच हव का
माझ्या लक्षात आलं नाही. 
समाजासाठी काही करायचय ना तर नावाचा बोभाटा न करता करा
कुठल्या पक्षाच नाव न घेता करा.
कमीत कमी झालेल्या गोष्टीची तीव्रता लक्षात घेऊन आणी नेतेपणा बाजूला ठेवुन

"माणूस नावाचा पण एक पक्ष असतो त्यात सामील व्हा"

गुरुवार, १४ जुलै, २०१६

"मला उमजलेला विठ्ठल"

"प्रपंचात सुखी रहा पण पांडुरंगाला विसरू नका"

असं नेहमी म्हणते आई

तिनेही ऐकलेलंच होतं कुठेतरी

पण तरी तिच्या बोलण्यातला विश्वास काही अंशी का होईना

"कुठेतरी कुणीतरी आपल्याला वरतून पाहतंय" असा आभास निर्माण करत होता

मी बघितलं नाहीए आणखीन त्याला

पण फक्त एक काळ्या रंगाची मूर्ती माहितेय मला

ज्याला सगळे "विठ्ठल" म्हणतात

१४ विद्या ४ वेद ४ उपवेद ६ वेदांग हे २८ योग घेऊन तो युगानयुगे विटेवर अचल उभा आहे

आपलं मागणं आपली गाऱ्हाणी घेऊन लोक त्याच्या उंबरठ्यावर जातात

तो बिचारा आधीच विटेवर उभा आहे आणी त्यात ही असली

अपेक्षा घेऊन येणारी लाखों लोक

पण तरी तो अगदी निश्चिंत असतो

ना आश्वासन देतो ना अपेक्षा भंग करतो

पण जे देतो ते असतं आंतरिक सुख

एक निरागस हसुउमटतं लहान बाळापासून ते कणा मोडलेल्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरसुध्दा

"विठ्ठल विठ्ठल" म्हंटल की

कधी प्राक्तनांचे पुरावे नाहीतआणि कधी भविष्याचे देखावे नाहीत

अगदी सारं काही विसरून उभा "माणूसरूपी" धर्म "वारकरी"

नावाच्या छाटीखाली जमतो "आषाढी एकादशीला" आणी त्या चंद्रभागेत स्नान करून पुण्य मिळालं म्हणत निघतो परतीच्या वाटेने.

आता खरंच पुण्य मिळतं का तेही त्यालाच ठाऊक

विठ्ठलावर लिहीताना मी आस्तिक आहे की नास्तिक हा प्रश्न मला आजतागायत पडला नाही

कारण अध्यात्माचा पलीकडे जाऊन जाती धर्म झुगारुन

वर्ण वंश पैसा ह्या सगळ्याना तिलांजलि देऊन "एक माणूस रूपी अभंग रचलाय" त्या पांडुरंगाने ज्याला आपण "वारकरी" म्हणतो

"आश्चर्य फक्त इतकंच की काळा असूनही इतका तेजोमय की त्याच्या रूपात तल्लीन होऊन जावं तो फक्त पांडुरंग आहे"

एक वेगळीच अनुभूती आहे हा "काळा विठ्ठल"

कुणाचा सखा

कुणाचा वाली

तर उभ्या जगाची माऊली

ह्या एकादशीला पुन्हा त्या खऱ्या धर्माला

त्या प्रत्येक वारकऱ्याला

ज्याचं "तीर्थ विठ्ठल आहे


आणी क्षेत्र देखील विठ्ठल आहे"

एकादशीच्या शुभेच्छा...

अव्यक्त...व्यक्त करताना

१४ जुलै २०१६



















सोमवार, २७ जून, २०१६

खरच कुणाला जागरूक म्हणाव???

वारीच दर्शन घडला आज.
पाहिला... प्रत्येकाच्या चेहऱ्याला निरखून
प्रत्येक जण जात धर्म विसरून
त्या पांडुरंगाच मुखदर्शन
घ्यायला निघाला होता 
तो दिसेल अथवा दिसणार देखील नाही 
पण तरी 
डोळ्यात भाव होता माझा विठ्ठल सगळ सावरेल 
कुठे ही अडाणी भोळे भाबडी लोक
त्या प्रत्यक्षात न दिसणार्याला
कर्ता करवीता मानतात
फक्त स्वतःसाठी नाही तर्
अवघ्या जगासाठी मागण मागतात
"अगदी जात धर्म विसरून"
साऱ्याना सुखात ठेव
सगळ्यानच रक्षण कर म्हणतात
आणी
एकीकडे सुशिक्षित लोक
विधेयक घेऊन आरक्षण मागतात
खरच कुणाला जागरूक म्हणाव???
"स्वमतीवर अविश्वास असणाऱ्याना
आरक्षणाच्या कुबड्या लागतात "
झोम्बनार‬ आहे पण सत्य आहे 

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

२१ वर्ष ८ महिने २५ दिवस

२१ वर्ष ८ महिने आणी २५ दिवस होत आहेत 
तुझी ओळख होऊन...
पण तरी देखील आजही तु तशीच आहे जशी मला पहिल्यांदा पाहून आनंदी होतीस..
कदाचित तु पहिलीच व्यक्ती असशील जीने मला पाहताच प्रेम केला ना की मला पारखुन
बऱ्याच दिवसाच लिहायचं होता हे..पण हिम्मतच नव्हती होत..आणी मग आज धाडस केला...
एका अशा व्यक्तीबद्द्ल लिहायचं जीने व्यक्ती एकच पण भुमिका अनेक निभावल्या..माझा हातात असता तर आयुष्याच्या रंगभूमीवरचा उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मी तुलाच दिला असता.. कारण याहून सरस भुमिका मला पाहायचीही नाहीए..
वाटेल तेव्हा जिच्यावर चिड्ता याव
गरज पडले की तिच्याजवळ रडता याव
हसून सार काही उलघडता यावं..
इतक सुंदर नातं जेव्हा मिळत ना..मग थोडसं पटत..
नसीब नाम की चिड़िया
जरूर कही तो उड़ती है..
घराबाहेर टाकलेल्या त्या पहिल्या पावलाने त्या दिवशी मान वळवायला नकार दिला होता...कारण तुझ्या भोवती घोंगावनरा हा भ्रमर कदाचित तुझ वलय भेदुच शकला नसता..आणी पुन्हा तीच मिठी तीच ओढ तीच साखरझोप आणी तुझ्या हातच ते जेवण गोड...
खुप धाडस करून लिहिलय  बराच  वेळ ही  लागला हे लिहायला...आणी तुलाही 44 वर्ष लागलीत  अस काहीतरी वाचनात यायला..
तुला काही द्यावं इतकी कुवत देवाने दिली नाही..
पण जीने "अस्तित्व" या शब्दाची जाणीव दिली अशा व्यक्तीला माझा शब्दांची ही वाढदिवसाची तुटपुंजी भेट 
Yes...
she is my friend..
she is my sister..
She is my girlfriend.. 
and yes she is my mother 
Happy birthday आई....
- अव्यक्त..व्यक्त करताना 

शनिवार, २ जानेवारी, २०१६

नटसम्राटास अर्पण....

प्रत्येक शब्दागनीक हृदयाला खाचा पडत होत्या
आणी भावनांशी खेळ होत होता
मान्य आहे पराभवाच्या जखमा
आणी विजयाचे झेंडे घेऊन गलबत पुन्हा बंदरातच उतरत
पण इतक का मनावर घेतला नाना...
की आमच्या सारख्या सामन्यालाही तुम्हाला टाळ्यांऐवजी
पाण्याने भरलेल्या डोळ्याने सलामी द्यावी लागली.
माझ्या शब्दांमधे इतक सामर्थ्य नसेलही
की मी लोकांच्या आसवांवर माझ्या दुःखाची पिका घेऊ
पण तुम्ही का फक्त 3 तास घेतले.....
होता तुम्हाला हक्क आम्हाला आणखीन रडवन्याचा
आमच्या आसवांनवर तुमच्या दुःखाची पीक घेण्याचा
माहीत नव्हता की माणसाच प्राक्तन
त्याला भविष्यात  अशा गर्तेत नेवून सोडत की
त्याच्या अवहेलनेला आयुष्याचा रंगमंच ही कमी पडतो
आणी मग जगावं की मराव हा एकच प्रश्न उरतो
to be or not be that is the question??
तुमचा तेही फारच आवडला नाना
भगदाड पडलेल्या तटबंदीला
कुठे जुन्या लढायांची आठवण करून  देता "सरकार "
काही म्हणा...
पण तुमच्या "सरकारने" मात्र मन मोहून टाकला
आणी त्या भाडखाव मित्राने पण...
विक्रम गोखले सराना मनातून सलाम.
नियतीने त्या नटासोबत केलेली कुचेष्टा
कदाचीत विधात्याला पुरेशी वाटली नाही
म्हणुन त्याने पुन्हा
आमच्या पिढीसाठी एका नटसम्राटाला पाठवला
पुन्हा असला कलाकार असली कलाक्रुती पाहण्याचा योग
डोळ्यांना मिळेल की नाही माहीत नाही
पण इतका मात्र मी ठाम आहे
ज्याने हजारो लाखो लोकांवर ज्याची कला गुलाल बुक्क्या प्रमाणे उधळली
तो गणपत रामचंद्र बेल्वल्कर तुम्हीच आहात
आणी तुम्हीच "नटसम्राट"
"नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही"

-अव्यक्त.... व्यक्त होताना
पुष्कर धनंजय देशमुख